Ram Shinde : कर्जत व जामखेड तालुक्यातील रस्त्यांची कामे तातडीने पुर्ण करा, वनविभागाच्या परवानग्या घेण्यास विलंब झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार – सभापती राम शिंदे यांचा इशारा

मुंबई, 17 फेब्रुवारी, 2025 : जामखेड – कर्जत – श्रीगोंदा राष्ट्रीय महामार्ग 548 डी तसेच कर्जत व जामखेड तालुक्यातील राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग संदर्भातील सर्व प्रलंबित रस्त्यांची कामे, दुरूस्ती कामे मार्च 2025 अखेरपर्यंत तातडीने पूर्ण करण्यात यावीत. वन विभाग व वन्यजीव विभागाकडून प्राप्त करावयाच्या आवश्यक परवानग्या विनाविलंब प्राप्त करण्यात याव्यात. वाहतूक व दळणवळण संदर्भात रहिवाशांची, प्रवाशांची गैरसोय होणार नाही याबाबत अत्यंतिक दक्षता घेण्यात यावी, असे निर्देश विधानपरिषदचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले.

Complete the road works in Karjat and Jamkhed talukas immediately, strict action will be taken against the officials if there is a delay in obtaining permits from the Forest Department - Chairman Ram Shinde warns

आज विधानभवन येथे विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या दालनात कर्जत-जामखेड मतदारसंघातील सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग, वन विभाग यांच्या अधिकाऱ्यांची प्रलंबित कामांसंदर्भातील आढावा बाबतची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली. त्याप्रसंगी विधानपरिषदचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी वरीलप्रमाणे आदेश दिले.

तुकाई उपसा सिंचन योजना व श्रीगोंदा-वालवड-जामखेड राष्ट्रीय महामार्ग 548 डी व कर्जत व जामखेड तालुक्यातील राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग संदर्भातील सर्व प्रलंबित रस्त्यांची कामे वन विभाग व वन्यजीव विभागाकडून प्राप्त करावयाच्या आवश्यक परवानग्या विनाविलंब प्राप्त करण्यात याव्यात. या संदर्भात विलंब झाल्यास त्याबाबतची जबाबदारी संबंधितांवर निश्चित करून कारवाई केली जाईल. असा इशारा देत या संदर्भात पुढील बैठक वनमंत्री यांच्या समवेत घेण्यात येणार असल्याचेही विधानपरिषदचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

अढळगाव ते जामखेड, रांजनगाव ते उखलगाव, श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी श्रीगोंदा, देऊळगाव, मांडवगणरस्ता, न्हावरा-इनामगांव-काष्टी-श्रीगोंदा-जामखेड रस्ता, मौजे डोकेवाडी, भावडी, बिकटकेवाडी, माळवाडी, वालवड व सुपे जिल्हा अहिल्यानगर येथील वनविभागालगत व वनविभागात असणाऱ्या रस्त्यांची दुरूस्ती, अढळगाव ते जामखेड, नेटकेवाडी-कुंभेफळ-अळसुंदे या रस्त्यांची कामे, दुरूस्ती मार्च अखेरपर्यंत पुर्ण करण्याबाबतचे आदेश विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले.

बैठकीस अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) डॉ.व्ही.बेन उप वन संरक्षक, पुणे (वन्यजीव) तुषार चव्हाण विभागीय वन अधिकारी साल विठ्ठल, अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर,कार्यकारी अभियंता संजय शेवाळे, सहाय्यक अभियंता प्रशांत वाकचौरे, उपविभागीय अभियंता शशिकांत सुतार उपस्थित होते.