मार्च अखेरपर्यंत खर्ड्यातील मुस्लिम मदारी वसाहतीचे काम पूर्ण करा – विधान परिषदचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले प्रशासनाला निर्देश

मुंबई, 17 फेब्रुवारी, 2025 : यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत जामखेड तालुक्यातील खर्डा गावात 20 कुटूंबियासाठी मुस्लीम मदारी वसाहतीसाठी निधीस मंजूरी देण्यात आली होती. परंतु सदरचे काम अपूर्ण अवस्थेत असून, या कामाला गती देऊन सदर वसाहतीचे काम 31 मार्च अखेर पूर्ण करावे, असे निर्देश विधानपरिषदचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.

Complete work of Muslim Madari Colony in Kharda by the end of March - Legislative Council Chairman Ram Shinde instructed the administration

आज विधानभवन येथे जामखेड तालुक्यातील खर्डा येथील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतंर्गत उभारण्यात येत असलेल्या मदारी वसाहतीच्या अपुर्ण कामासंदर्भातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी सभापती प्रा. राम शिंदे बोलत होते.

Complete work of Muslim Madari Colony in Kharda by the end of March - Legislative Council Chairman Ram Shinde instructed the administration

यावेळी मंत्री अतुल सावे, इतर मागासवर्ग कल्याण विभागाचे संचालक ज्ञानेश्वर खिल्लारी, प्रादेशिक उपसंचालक भगवान वीर, सहाय्यक संचालक विनोद लोंढे, माजी सभापती रवींद्र सुरवसे, खर्डा ग्रामपंचायतीच्या सरपंच संजीवनी पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैजीनाथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे, महालिंग कोरे, महेश दिंडोरे व खर्डा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

Complete work of Muslim Madari Colony in Kharda by the end of March - Legislative Council Chairman Ram Shinde instructed the administration

सभापती प्रा. राम शिंदे पुढे म्हणाले, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत जामखेड तालुक्यातील खर्डा गावात 20 कुटूंबियासाठी मुस्लीम मदारी वसाहतीसाठी 2018 ला निधीचे वितरण करण्यात आले होते. परंतु अद्यापही हे काम अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे नव्याने निविदा प्रकिया राबवून, स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन वसाहतीचे काम तात्काळ पूर्ण करावे.

Complete work of Muslim Madari Colony in Kharda by the end of March - Legislative Council Chairman Ram Shinde instructed the administration

मदारी वसाहतीचे काम हा राज्यातील पहिला  प्रकल्प आहे. त्यामुळे या वसाहतीचे काम उत्कृष्ट व गुणवत्तापूर्ण करावे. तसेच वसाहतीच्या ठिकाणी तेथील नागरिकांना आवश्यक सुविधा देखील उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचनाही सभापती प्रा. शिंदे यांनी केली.

Complete work of Muslim Madari Colony in Kharda by the end of March - Legislative Council Chairman Ram Shinde instructed the administration