जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात कोरोनाचा उद्रेक आता थांबायचे नावच घेत नसल्याचे दिसु लागले आहे. गुरूवारी कोरोनाचा मोठा विस्फोट झाल्याचे चित्र समोर आले आहे. गुरूवारी 40 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. कोरोना हाॅटस्पाॅट ठरलेल्या दिघोळ गावची परिस्थिती आता चिंताजनक बनली आहे. याच गावातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या सर्वाधिक आहे. (Corona blast in Jamkhed taluka)
जामखेड तालुका आरोग्य विभागाने गुरूवारी दिवसभरात केलेल्या 161 रॅपिड अँटीजेन चाचण्यांमध्ये 23 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. दरम्यान जिल्हा रूग्णालयात दि 20 ते 24 मार्च या कालावधीत कोरोना तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या 315 RTPCR स्वॅबनमुन्यांचे कोरोना तपासणी अहवाल आज प्रशासनाला प्राप्त झाले यामध्ये 17 जण कोरोनाबाधित असल्याचे गुरूवारी निष्पन्न झाले आहे. (Corona blast in Jamkhed taluka)
गुरुवारी करण्यात आलेल्या रॅपिड अँटीजेन चाचण्यांमध्ये दिघोळ येथील 21 तर जामखेड येथील 02 असे 23 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर जिल्हा रूग्णालयातून प्राप्त झालेल्या RTPCR अहवालात जामखेड 08, दिघोळ 03, शिऊर 01, पाडळी 02, सावरगाव 01, फक्राबाद 01, अहमदनगर 01 या रूग्णांचा समावेश आहे अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डाॅ संजय वाघ यांनी दिली आहे. (Corona blast in Jamkhed taluka