Corona Outbreak : जामखेड तालुक्यात कोरोना झालाय सुसाट;सोमवारी कोरोना नाबाद 72

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात कोरोनाचा उद्रेक (Corona Outbreak) सुरूच आहे. कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होऊ लागल्याने जामखेड तालुक्यातील जनतेच्या चिंता आता वाढल्या आहेत.जामखेड तालुक्यात मागील दोन दिवसांत कोरोनाने सलग अर्धेशतक झळकावले होते. सोमवारी कोरोनाने जामखेड तालुक्याला आजवरचा सर्वात मोठा तडाखा दिला आहे. कोरोनाने दिवसभरात पाऊण शतक झळकावले आहे. यामुळे जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. ( Shocking – Corona Outbreak continues in Jamkhed taluka on Monday, corona unbeaten 72)

सोमवारी जामखेड तालुका आरोग्य विभागाने सुमारे 175 नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या. यामध्ये सुमारे 29 जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. नव्या कोरोनाबाधितांमध्ये जामखेड 09, दिघोळ 11, पाडळी 07, अंतरवली भूम 01, आष्टी 01 या रूग्णांचा समावेश आहे. जिल्हा रूग्णालयाकडून तालुका प्रशासनाला 165 RTPCR कोरोना तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये 43 जण कोरोनाबाधित निघाले आहेत. यामध्ये दिघोळ 37 व जामखेड 06 या रूग्णांचा समावेश आहे. (Shocking: Corona Outbreak continues in Jamkhed taluka on Monday, corona unbeaten 72)

Outbreak, Corona Outbreak

सोमवारी दिवसभरात तब्बल 72 रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये दिघोळ गावातील सर्वाधिक 48 रूग्णांचा समावेश आहे. दिघोळ गावातील कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी प्रशासनाकडून ज्या उपाययोजना व्हायला हव्यात त्या होताना दिसत नाहीत. बैठकांचे फार्स सध्या दिघोळमध्ये होताना दिसत आहेत. दिघोळकरांनी आता आपले गाव कोरोनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी स्वता:च पुढाकार घेणे अत्यंत गरजेचे बनले आहे. (Shocking: Corona Outbreak continues in Jamkhed taluka on Monday,Corona unbeaten 72)

एकिकडे दिघोळ गाव कोरोनाच्या विळख्यात अडकलेले असतानाच दुसरीकडे जामखेड शहरही कोरोनाच्या विळख्यात अडकण्याचा धोका निर्माण झाला आहे. सोमवारी दिघोळ पाठोपाठ जामखेड शहरातही मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रूग्ण सापडले आहेत. जामखेडमध्ये सोमवारी 15 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाने आज दिवसभरात 40 नागरिकांचे RTPCR स्वॅबनमुने कोरोना तपासणीसाठी अहमदनगर जिल्हा रूग्णालयात कोरोना तपासणीसाठी पाठवले आहेत अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डाॅ संजय वाघ यांनी दिली.(Shocking: Corona Outbreak continues in Jamkhed taluka on Monday,corona unbeaten 72)

दरम्यान  गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 68,020 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 291 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील  कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,20,39,644 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 1,61,843 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव अधिक म्हटलं आहे. यामुळे आता महाराष्ट्राच्या चिंता वाढल्या आहेत. (Shocking: Corona Outbreak continues in Jamkhed taluka on Monday, corona unbeaten 72)

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग वगळता सर्व सरकारी व खाजगी शाळा बंद ठेवण्याचे आदेश अहमदनगरचे  जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी  आज काढले आहेत. त्यानुसार दिनांक 30 एप्रिल पर्यंत शाळा  बंद राहणार आहेत. यामुळे पुढील महिनाभर शाळांमधील चिमुकल्यांचा किलबिलाट थांबणार आहे. (Shocking: Corona Outbreak continues in Jamkhed taluka on Monday, corona unbeaten 72)