Crisis of Omicron in Maharashtra | महाराष्ट्रावर घोंघावू लागले नवे संकट : मुंबई, पुणे, ठाण्यात ओमिक्रॉनचे 28 संशयित रुग्ण?
महाराष्ट्रासाठी पुढचे 48 तास महत्वाचे
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Crisis of Omicron in Maharashtra | देशात ओमिक्रॉन कोरोना व्हेरिएंटचा शिरकाव झाला आहे. कर्नाटकात 2 रूग्ण आढळून आल्याने एकिकडे खळबळ उडालेली असतानाच महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 28 संशयित रुग्ण (28 suspected Omicron patients) असल्याचे समोर आल्याने महाराष्ट्र हादरून गेला आहे. येत्या 48 तासात 28 संशयित रूग्णांचे अहवाल काय येतात ? याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
संपुर्ण जगाची झोप उडवून देणारा ओमिक्रॉन कोरोना व्हेरिएंट भारतात (Omicron in India) आला आहे. दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) प्रवास करून आलेले प्रवाशी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. कर्नाटकातील दोघांना ओमिक्रॉन झाल्याचे निष्पन्न झाले. त्यातच महाराष्ट्राची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर आली आहे. आफ्रिका खंडातील देशांमधून प्रवास करून आलेले 28 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. हे सर्व जण मुंबई, पुणे, ठाणे या भागातील आहेत अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
महाराष्ट्रासाठी 48 तास महत्वाचे
महाराष्ट्रात आढळून आलेल्या 28 संशयित रुग्णांपैकी मुंबईतील 10 जण तर ऊर्वरीत 18 जण वेगवेगळ्या शहरातील आहेत. राज्यातील सर्वाधिक गर्दीच्या शहरात ओमिक्रॉनचे संशयित रुग्ण सापडल्याने राज्याची डोकेदुखी वाढली आहे. सर्व संशयित रुग्णांपैकी 25 जण गेल्या महिनाभरात परदेशी प्रवास करून महाराष्ट्रात आले आहेत. या प्रवाश्यांच्या संपर्कात 3 जण आलेले आहेत. हे सर्व कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या सर्वांचे जिनोम नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. येत्या 48 तासांत या सर्वांचे अहवाल येणे अपेक्षित आहे.
महाराष्ट्रावर घोंघावू लागले नवे संकट
संपूर्ण जग कोरोनाने त्रस्त असतानाच आता आणखीन एका मोठ्या संकटाचे काळे ढग महाराष्ट्रावर विशेषता: मुंबईवर दाटून आले आहेत. गेल्या महिनाभरात एकट्या मुंबई तब्बल 2500 पेक्षा अधिक नागरिक परदेशी प्रवास करून मुंबई दाखल झाले आहेत.हे सर्व जण हाय रिस्क असलेल्या 40 देशांमधून आलेले आहेत. प्रशासनाने या सर्वांची शोध मोहिम वेगाने हाती घेतली आहे.
प्रशासनाने 862 जणांचा शोध घेतला असून त्या सर्वांची RTPCR तपासणी केली आहे.त्यातील 25 जण कोरोनाबाधित आढळून आलेत. तर त्यांच्या संपर्कातील 3 जण कोरोनाबाधित आहेत. हे सर्व ओमिक्रॉन संशयित मुंबई, पुणे आणि ठाणे या मोठ्या शहरातील आहेत.मुंबई आढळून आलेल्या काही संशयितांवर सेव्हन हिल्स हाॅस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर माईल्ड लक्षणं असलेल्यांना घरी क्वारंटाईन करण्यात आलं आहे.