Department of Health Group D Paper 2021 | आरोग्य विभाग गट ड पेपर 2021 | “या” तारखेला होणार परिक्षा !
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Department of Health Group D Paper 2021 | महाराष्ट्र सरकारने आरोग्य विभागातील गट क व गट ड संवर्गाची मेगा भरती हाती घेतली आहे.या पदांसाठी होणाऱ्या परीक्षेच्या नव्या तारखा सरकारने जाहीर केल्या आहेत. 24 ऑक्टोबर 2021 ला गट क तर 31ऑक्टोबर 2021 ला गट ड या विभागाच्या परिक्षा होणार आहेत. (Group C examinations will be held on 24th October 2021 and Group D examinations will be held on 31st October 2021)
आरोग्य विभागाकडून यंदा मेगा नोकरभरती हाती घेण्यात आली आहे. यात गट क व ड संवर्गाच्या जागा भरल्या जाणार आहेत. मागील महिन्यात या पदांसाठी परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या परंतु ज्या कंपनीला या परिक्षा घेण्याची जबाबदारी देण्यात आली होती, त्या कंपनीने घातलेल्या घोळामुळे परिक्षा ऐनवेळी रद्द करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली होती.
हाॅल तिकीटाच्या गोंधळामुळे ऐनवेळी परिक्षा रद्द झाल्या होत्या.उमेदवारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना उमेदवारांची माफी मागावी लागली होती.
आठ परिमंडळांसाठी संपर्क अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
24 व 31 ऑक्टोबर रोजी होणारी परिक्षा नियोजनबद्ध व्हावी याकरिता राज्यस्तरीय निरीक्षक म्हणून उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची आठ परिमंडळासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी संबंधित परिमंडळासाठी संपर्क अधिकारी म्हणून काम करतील.
आरोग्य विभाग गट क पेपर 2021
Department of Health Group C Paper 2021 | आरोग्य विभागाने हाती घेतलेल्या मेगाभरतीतील आरोग्य विभाग गट क पेपर 2021 हा 24 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे. या परिक्षेचे हाॅल तिकीट 16 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाने वेबसाईटवर जारी केले आहेत.
आरोग्य विभाग गट ड पेपर 2021
Department of Health Group D Paper 2021 | तर दुसरीकडे आरोग्य विभागाकडून ड संवर्गाचीही परिक्षा घेतली जाणार आहे. येत्या 31 ऑक्टोबर 2021रोजी आरोग्य विभाग गट ड पेपर 2021 ची परिक्षा राज्यात होणार आहे. या परिक्षेचे हाॅल तिकीट लवकरच जारी केले जाणार आहेत. आरोग्य विभागाच्या वेबसाईटवर हाॅल तिकीट उपलब्ध होणार आहे.
आरोग्य विभागाकडून हाती घेण्यात आलेल्या पदभरतीसाठी एकाचवेळी दोन जागांवर अर्ज केलेल्या उमेदवारांची परिक्षा एकाचवेळी होणार आहे यामुळे उमेदवारांमध्ये मोठी नाराजी आहे. दुसर्यांदा परीक्षांच्या तारखा जाहीर होऊनही अनेक घोळ कायम आहेत. खाजगी कंपनीने कामात शंभर टक्के सुधारणा केलेली नाही.
एमपीएससी मार्फत परिक्षा व्हाव्यात
राज्य सरकारने कुठलीही नोकर भरती करताना खाजगी कंपन्यांकडे भरती प्रक्रिया न राबवता ही प्रक्रिया एमपीएससी मार्फत राबवावी अशी मागणी आता जोर धरत आहे.