Devendra fadnavis cm :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कोण घेणार शपथ, महत्वाची अपडेट आली समोर

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (devendra fadnvis cm) हे आज तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. नगरसेवक ते मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास राहिला आहे. महायुती सरकारचा शपथविधी (oath ceremony maharashtra government) सोहळा आज मुंबईतील आझाद मैदानावर होत आहे. या शपथविधी सोहळ्याला अवघे काही तास उरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत कोण कोण शपथ घेणार याबाबत आता एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.

Devendra Fadnavis cm ,Who will take oath along with Chief Minister Devendra Fadnavis, important update came out, oath ceremony maharashtra government,

मुंबईतील आझाद मैदानावर आज महायुती सरकारचा शाही शपथविधी सोहळा पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर जवळपास 14 दिवसांनी महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह, भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री, महायुतीचे आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या शपथविधीमध्ये कॅबिनेट मंत्र्यांचाही शपथविधी पार पाडावा अशीदेखील काही आमदारांची इच्छा आहे. मात्र, या आमदारांची इच्छा अपूर्ण राहण्याची चिन्ह आहेत.

आजच्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहे. त्याशिवाय उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे शपथ घेणार आहेत. या तिघांशिवाय इतर कोणाचाही मंत्री म्हणून शपथविधी पार पडणार नाही. त्यामुळे इतर आमदारांचा मंत्री म्हणून शपथविधी हा राजभवनात पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आजच्या शपथविधीनंतर ⁠उर्वरित आमदारांचा शपथविधी हा पुढच्या आठवड्यात राजभवनात होणार आहे. यावेळी 31 आमदारांना मंत्री पदाची शपथ दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ⁠मात्र, कोणत्या पक्षाला कोणते खातं मिळणार, यावर अजूनही सस्पेन्स कायम आहे. ⁠यामुळे पुढील चार ते पाच दिवस खात्यांबाबत महायुतीत खलबतं सुरुच राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गेल्या 24 तासात देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी तीनदा वर्षा बंगल्यावर गेले. रात्री दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेत एकनाथ शिंदे यांनी आपल्या मागण्या देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडल्या. यावर देवेंद्र फडणवीसांनी आपण वरिष्ठांसोबत चर्चा करणार असल्याचे सांगितले. ⁠मंत्री पदावरुन महायुतीत अजून ही खलबतं सुरू आहेत.⁠गृह, अर्थ या व्यतिरिक्त काही महत्वाच्या खात्यांवरुन अजून ही चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर अधिवेशनापूर्वी ११ किंवा १२ डिसेंबरला करण्याचे ठरविण्यात आले आहे. मंत्रीपदासाठी कोणाला संधी द्यायची, खातेवाटप आणि मंत्रीपदांच्या वाटपाचा पेच यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपूर्ण मंत्रिमंडळाचा जंगी शपथविधी करण्याचे नियोजन तूर्तास फिसकटले आहे. शिवसेना (शिंदे) गटाचे नेते भरत गोगावले यांनी काही वेळापूर्वी माध्यमांशी बोलताना इतर मंत्र्यांच्या शपथविधीबाबत माहिती दिली.