ब्रेकिंग न्यूज : ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन मंगळवारी चोंडी दौर्‍यावर, धनगर आरक्षणप्रश्नी साधणार अंदोलकांशी संवाद, चोंडीत होणाऱ्या बैठकीकडे लागले राज्याचं लक्ष !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा  :  धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी (Dhangar Aarakshan) करावी, या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चोंडी (Chondhi Uposhan) या जन्मगावी सुरु असलेल्या उपोषणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. सरकारच्या वतीने अंदोलकांशी चर्चा करण्यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan) हे दुसऱ्यांदा चोंडीत दाखल होणार आहेत. मंगळवारी (26 रोजी) दुपारी मंत्री महाजन हे चोंडीतील अंदोलकांशी संवाद साधणार आहेत. या बैठकीत काय तोडगा निघणार ? याकडे संपुर्ण राज्याचं लक्ष असणार आहे.

dhangar aarakshan Breaking News, Rural Development Minister Girish Mahajan will visit Chondi on Tuesday, Dhangar reservation issue will interact with protestors in Chondi, attention of the state is on meeting in Chondi,

धनगर आरक्षण अंमलबजावणी व्हावी यासाठी यशवंत सेनेच्या वतीने श्री क्षेत्र चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसरात गेल्या वीस दिवसांपासून आमरण उपोषणाचे अंदोलन हाती घेण्यात आले आहे. यशवंत सेनेच्या वतीने बाळासाहेब दोडतले, माणिकराव दांगडे, आण्णासाहेब रुपनवर, सुरेश बंडगर, नितीन धायगुडे, समाधान पाटील, अक्षय शिंदे हे सर्वजण उपोषणाला बसले आहेत. या अंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातील धनगर बांधव, विविध राजकीय पक्षांचे नेते, आमदार, खासदार चोंडीतील उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषणाला पाठिंबा दर्शवत आहेत.

चोंडी येथील उपोषणकर्ते सुरेश बंडगर व आण्णासाहेब रूपनवर या दोघांची प्रकृती खालावत चालली आहे. मुंबईतील बैठकीत तोडगा न निघाल्याच्या निषेधार्थ दोन्ही उपोषणकर्त्यांनी पाणी त्यागले आहे. दोन्ही उपोषणकर्त्यांची तब्येत गंभीर होत चालल्याने याचे पडसाद राज्यभर उमटत आहे. चोंडीतील अंदोलकांच्या पाठिंब्यासाठी धनगर समाजाकडून ठिकठिकाणी अंदोलने करून राजकीय दबाव वाढवला जात आहे. दरम्यान सोमवारी चोंडीतील उपोषणकर्त्यांची तब्येत खालावल्याने अहमदनगर येथील 15 डाॅक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी करत उपचार केले.

रविवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चोंडीतील अंदोलक बाळासाहेब दोडतले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. सोमवारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे अंदोलकांशी चर्चा करण्यासाठी चोंडीत दाखल होणार होते, परंतू तांत्रिक अडचणींमुळे ते येऊ शकले नाहीत. परंतू सोमवारी रात्री उशिरा मंत्री महाजन यांचा शासकीय दौरा जाहीर झाला. त्यानुसार मंत्री गिरीश महाजन हे मंगळवारी (26 रोजी) दुपारी चोंडीतील अंदोलकांची भेट घेणार आहेत. मंत्री महाजन व अंदोलक यांच्यात चोंडी येथे होणाऱ्या बैठकीत काय तोडगा निघणार याकडे संपुर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

चोंडी येथे 6 सप्टेंबर 2023 पासून धनगर आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने आमरण उपोषणाचे अंदोलन हाती घेण्यात आले. आमदार प्रा.राम शिंदे यांनी चोंडीत सुरू असलेल्या अंदोलनाकडे शासनाचे लक्ष वेधल्यानंतर उपोषणाच्या 11 व्या दिवशी म्हणजेच 16 सप्टेंबर रोजी सरकारच्या वतीने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी चोंडीला रात्री भेट दिली होती. यावेळी त्यांनी अंदोलकांशी चर्चा केली. मुंबईत बैठक घेऊ. चर्चा करू. तोडगा काढू. असा शब्द त्यांनी या बैठकीत दिला होता.

त्यानुसार मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात सरकार व धनगर समाजातील नेते व अंदोलकांची बैठक पार पडली. त्यात आरक्षणाबाबत ठोस तोडगा निघाला नाही. परंतू आता मुंबईतील बैठकीनंतर मंगळवारी 26 सप्टेंबर 2023 रोजी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे अंदोलकांशी चर्चा करण्यासाठी दुसर्‍यांदा चोंडीत येणार आहेत. तत्पूर्वी आमदार प्रा.राम शिंदे हे सातत्याने चोंडीतील अंदोलकांची भेट घेऊन त्यांच्याशी होणाऱ्या चर्चेचा तपशील तसेच उपोषणकर्त्यांची खालावत चाललेली प्रकृती याबाबतची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व राज्य सरकारला सातत्याने कळवत होते. यामुळे सरकार पातळीवर जोरदार हालचाली सुरू होत्या.

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे मंगळवारी (26 सप्टेंबर 2023 रोजी) विशेष विमानाने जळगाव येथून बारामतीला येणार आहेत. तेथून ते मोटारीने चोंडीला रवाना होतील. दुपारी बारा वाजून 20 मिनीटांनी चोंडीत दाखल होतील. सुमारे दोन तास ते चोंडीत थांबणार आहेत.अंदोलकांशी चर्चा केल्यानंतर दुपारी दोन वाजता महाजन हे बारामतीला रवाना होतील. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे संकटमोचक म्हणून धावून येणार का ? याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

dhangar aarakshan Breaking news, Rural Development Minister Girish Mahajan will interact with protesters in Chondi, the attention of the state is on the meeting to be held in Chondi on Tuesday,