Dhangar reservation on MP Imtiaz Jalil : संसदेत खासदार इम्तियाज जलील यांनी गाजवला धनगर आरक्षणाचा मुद्दा, धनगर आरक्षणावर जलील यांनी केली मोठी मागणी !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्रात मराठा (Maratha) धनगर हे दोन समाज आरक्षणाच्या मागणीवरून आक्रमक झाले आहेत. आरक्षणाच्या मागणीवरून रोज अंदोलने होत आहेत. ओबीसी (OBC) समाजही आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झालेला आहे. ऐन लोकसभा (Lok Sabha speech) निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाचा मुद्दा तापल्याने राजकीय व सामाजिक पाटावर याचे पडसाद उमटत आहेत. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (budget session of Parliament 2024) छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील (Chhatrapati Sambhaji Nagar MP Imtiaz Jalil) यांनी धनगर आरक्षणाचा (ST Reservation) मुद्दा गाजवला आहे. जलील यांनी संसदेत धनगर आरक्षणावर (Dhangar reservation) बोलताना मोठी मागणी (Big demand) केली आहे.

Dhangar reservation on MP Imtiaz Jalil, MP Imtiaz Jalil raised issue of Dhangar reservation in Parliament, Imtiaz Jalil made big demand on Dhangar reservation, budget session of Parliament 2024

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (budget session of Parliament 2024)छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडली. यावेळी बोलताना जलील म्हणाले की, महाराष्ट्रातील धनगर समाज 1955 पासून एसटी आरक्षणाची मागणी करत आहे. आजवर देशात अनेक सरकारे आली आणि गेली पण धनगर समाजाला अजूनही न्याय मिळालेला नाही. महाराष्ट्रात धनगर समाज एनटीत आहे तर केंद्र सरकारच्या यादीत ओबीसीत आहे. पण धनगर समाजाची मुळ मागणी एसटी आरक्षणाची आहे. धनगर आणि धनगड (Dhangar and Dhangad) हे दोन्ही समाज एकच आहेत. इतर राज्यात धनगड तर महाराष्ट्रात धनगर म्हणून या समाजाला ओळखले जाते. महाराष्ट्रातील आजवरच्या सरकारने धनगर समाजाला न्याय दिला नाही, अशी टीका त्यांनी यावेळी बोलताना केली.

यावेळी पुढे बोलताना जलील म्हणाले की, मराठा समाजालाही आरक्षण मिळावे ही आमची मागणी आहे. मनोज जरांगे सारख्या सामान्य माणसाने मराठा आरक्षणाच्या मागणीवरून महाराष्ट्र सरकारला सळो की पळो करून सोडले आहे. राजकीय स्वार्थासाठी धनगर समाजाचा आजवर कोणी नेता झाला नाही. धनगर समाजाची महाराष्ट्रात किती लोकसंख्या आहे ? यावर अनेकांचे दावे प्रतिदावे आहेत. महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना व्हावी, अशी आमची मागणी आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत महाराष्ट्र सरकारने कमिटी बनवली. धनगर समाजाची फसवणूक केली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कमिटीवर कमिटी नेमल्या गेल्या. आता धनगर समाजाच्या बाबतीतही हेच होत आहे. धनगर समाजावर किती दिवस अन्याय केला जाणार, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाचा एसटी समावेश करावा यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता असे सांगण्यात आले, परंतू तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तसा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला नव्हता, त्यावेळी सरकारकडून खोटी माहिती देण्यात आली, असा जोरदार हल्लाबोल करत जलील यांनी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. पण आता महाराष्ट्रात आणि केंद्रात भाजपाची सत्ता आहे, आता तरी भाजपने महाराष्ट्रातील धनगर समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघाचा विचार केला असता बारामती, माढा, सोलापुर, सातारा हे 4 असे मतदारसंघ आहेत ज्यात धनगर समाजाच्या उमेदवाराशिवाय इतर कोणी जिंकून येऊच शकत नाही, अशी परिस्थिती आहे. तर 288 विधानसभा मतदारसंघापैकी 35 ते 40 असे मतदारसंघ आहेत ज्यात धनगर समाजाची मतसंख्या निर्णायक आहे. या ठिकाणी धनगर समाजाचाच उमेदवार निवडून येऊ शकतो अशी परिस्थिती आहे, असे सांगत जलील यांनी धनगर समाजाचे राजकीय महत्व संसदेत समजावून सांगितले.

अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी सरकारने तातडीने जागा उपलब्ध करून द्यावी

धनगर समाजाला मोठा इतिहास आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा इतिहास देशाला प्रेरणादायी आहे. त्यांच्या स्मारकासाठी जालना जिल्ह्यात धनगर समाज जागा मागत आहे, गेल्या अनेक वर्षांपासूनची ही मागणी आहे, तरीसुद्धा सरकार धनगर समाजाला अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी अजूनही जागा उपलब्ध करून देऊ शकलेले नाही. महाराष्ट्र सरकारने तातडीने अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी यावेळी बोलताना खासदार इम्तियाज जलील यांनी केली.

मुस्लिम समाजावर होत असलेल्या अन्यायावर खासदार इम्तियाज जलील यांनी फोडली वाचा

मुस्लिम समाजाला आरक्षण दिले जावे असे अनेक खासदार संसदेत मागणी करत आहेत, माझीही हीच मागणी आहे. पण मी इमानदारीने सांगु इच्छितो की, मला तुमच्याकडून आरक्षण मागायचे म्हणजे माझे डोके भिंतीला आपटण्यासारखे आहे. कारण आमच्या (मुस्लिम) सोबत आजवर सरकारकडून जो व्यवहार झालाय ते पाहता असे वाटतं की तुम्हाला आम्ही श्वास घेऊन देतोय हीच तुमच्यासाठी मोठी गोष्ट आहे असं सांगण्यासारखं आहे. त्यामुळे मी मुस्लिम समाजाचे आरक्षण तुमच्याकडे कसे मागु शकतो. परंतू या देशाला प्रगतीपथावर घेऊन जायचे असेल तर, आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की, मुस्लिम समाज पण या देशाचा अविभाज्य भाग आहे. त्याला पण न्याय द्यायला हवा. सगळ्या समाजाला सोबत घेऊन जाण्याची सरकारची भूमिका आहे तर सर्वांनाच न्याय द्यायला हवा, शरीराचा एक भाग जर निकामी झाला तर त्याला अपंगत्व येत. ताकदवान शरीरासाठी त्याचे सर्व भाग बलवान असायला हवेत, असे सांगत जलील यांनी मुस्लिम समाजावर होत असलेल्या अन्यायावर वाचा फोडली.

महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाचा तातडीने निर्णय घ्या – खासदार इम्तियाज जलील

खासदार इम्तियाज जलील पुढे म्हणाले, ज्या प्रमाणे संसदेत ओरिसा आणि आंध्रप्रदेशातील शेड्यूल ट्राईब्सला एड करण्याचा निर्णय घेत आहात, त्याच प्रमाणे महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाचा तातडीने निर्णय घेऊन न्याय द्यावा, अशी माझी मागणी आहे. तसेच मुस्लिम समाजालाही न्याय देण्यासाठी मोठं मन दाखवावं असे अवाहन त्यांनी यावेळी केंद्र सरकारला केले.

Edited By : Sattar Shaikh