दिल्ली : धनश्री विखे पाटलांकडून भाजपा नेत्यांच्या सौभाग्यवतींसाठी पुरणपोळी मेजवानी, भाजपा राष्ट्रीय अध्यक्षांच्या पत्नीसह अनेकांची उपस्थिती
दिल्ली : महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीची दिल्लीत खास ओळख व्हावी या करिता अहमदनगरचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या पत्नी धनश्री विखे पाटील यांनी दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या सौभाग्यवतींना पुरणपोळी व सार बेत असलेली मेजवानी दिली. अशा मराठमोळ मेजवानीचा दिल्लीकरांनी ही मनसोक्त आनंद घेतला.
महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीची दिल्लीकरांना ओळख व्हावी एवढेच नाही तर मराठमोळ्या पक्वन्नांची संपूर्ण देशाला चव कळावी या करिता खा.डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पत्नी धनश्री सुजय विखे पाटील यांनी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी भाजपच्या जेष्ठ नेत्यांच्या सौभाग्यवतींना मराठमोळ्या पक्वान्नांची मेजवानीसाठी निमंत्रित केले होते. यावेळी विखे यांनी पाहूण्यांसाठी खास पुरणपोळी व सार याचा बेत केला होता.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या पत्नी मल्लिका नड्डा ह्या स्पेशल ऑलोपिंक्स आहेत. त्यांचे या क्षेत्रात भरीव योगदान असून त्यांच्यामुळे दिव्यांग खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची संधी मिळते. या खेळाडूंनी मिळालेल्या संधीचे सोने करून देशासाठी अनेक पदके मिळविलेली आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांचा या प्रसंगी धनश्री विखे पाटील यांनी विशेष सन्मान केला.
दिल्लीतील या स्नेहभोजनात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या पत्नी मल्लिका नड्डा यांच्यासह नीता मांडविया, मृदुला प्रधान, नीलम रूडी, मंजू सिंह, राधिका चुघ, स्वाती वर्मा, सुरभी तिवारी, दीपाली चंदेल, शुभांगी मेंढे, अनुराधा यादव यांचा सहभाग होता. भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर सर्वांनी भोजनाचे कौतुक केले.
यावेळी सर्वांना श्री साईबाबांची मुद्रा असलेली शाल आणि महिला बचतगटांनी तयार केलेल्या उदबत्तीसह विविध उत्पादनांची भेट देण्यात आली.