Siddeshwar Shinde : तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिर ट्रस्टच्या वित्त व लेखा अधिकाऱ्याने स्विकारली 6 लाखांची लाच !
Dharashiv : धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तुळजापूरच्या श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या (Tuljabhavani Mandir Trust Tuljapur) वित्त व लेखा अधिकाऱ्याने (Siddeshwar Shinde) एका शासकीय ठेकेदाराकडून (Government Contractor) तब्बल 6 लाख रूपयांची लाच (6 lakh bribe) स्विकारल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वित्त व लेखाधिकारी (Finance and Accounts Officer Siddeshwar Shinde) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ताब्यात घेतले आहे. तुळजापूर पोलिस स्टेशनला (Tuljapur Police Station) गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. (Tuljapur bribe news)
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तुळजापूरच्या श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थानचे वित्त व लेखा अधिकारी सिध्देश्वर मधुकर शिंदे – Siddeshwar Madhukar Shinde वय-३९ वर्षे, धंदा-नोकरी ( वित्त व लेखाधिकारी ) तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट, तुळजापुर, जि. धाराशीव. ( वर्ग २) यांनी शासकीय ठेकेदाराकडे उर्वरीत बिल तपासणी करुन मंजुरीसाठी पाठविण्याकरीता तसेच अतिरिक्त सुरक्षा रक्कम म्हणुन भरलेली रक्कम परत मिळवून देण्यासाठी 10 लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबतची तक्रार धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती. सदर लाच मागणीची 3 फेब्रुवारी रोजी एसीबीने पडताळणी केली होती.
आज 7 फेब्रुवारी रोजी तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिर ट्रस्टचे वित्त व लेखा अधिकारी सिध्देश्वर मधुकर शिंदे याने पंचासमक्ष 6 लाख रूपयांची लाच स्विकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात लाचखोर वित्त व लेखाधिकारी सिध्देश्वर शिंदे हा अलगद अडकला. शिंदे याला 6 लाख रूपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याला एसीबीने ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात तुळजापूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
नेमकं प्रकरण काय ?
श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापुर संचलीत श्री तुळजाभवानी सैनिक विद्यालयाच्या (Shri Tuljabhavani Sainik Vidyalaya Tuljapur) प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या मजल्याचे तसेच प्रवेशद्वार व संरक्षक भिंतीचे बांधकामाचा ठेका एका 46 वर्षीय ठेकेदाराला मिळाला होता. सदरचे काम हे 03 कोटी 88 लाख रूपये खर्चाचे होते. सदर बांधकामाचे 90% काम पुर्ण झाले आहे.
सदर बांधकामाचे 02 कोटीपेक्षा जास्त बिल तपासणी करुन मंजुरीसाठी पाठवून मिळवून दिले म्हणुन तसेच उर्वरीत बिल तपासणी करुन मंजुरीसाठी पाठविणेकरीता तसेच अतिरिक्त सुरक्षा रक्कम म्हणुन भरलेली 34,60,579/-रु ही परत मिळवून देण्यासाठी वित्त व लेखाधिकारी सिध्देश्वर शिंदे याने तक्रार यांच्याकडे पंचासमक्ष 10,00,000/- ( दहा लाख रुपये) ची मागणी केली होती.
तडजोडीअंती 6,00,000/-रु ( सहा लाख रुपये) स्विकारण्याचे मान्य केले होते. आज रोजी पंचासमक्ष 6,00,000/-रु लाच रक्कम स्विकारताना सिध्देश्वर शिंदे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. तुळजापूर पोलीस स्टेशन येथे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.