Dhule ACB Trap Today: पाच लाख रूपयांची लाच स्विकारताना विशेष लेखा परीक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात, सहकार विभागात उडाली खळबळ
Dhule ACB Trap Today : पतसंस्थेच्या कब्जात असलेला व्यापारी गाळा व गाळ्याची अनामत रक्कम तक्रारदाराचे नावे वर्ग करून देण्यासाठी 5 लाख रूपयांची लाच स्विकारताना सहकार विभागातील विशेष लेखा परीक्षक तथा पतसंस्थेच्या अवसायकास एसीबीने रंगेहाथ पकडण्याची धडक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे सहकार विभागात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना नगर परिषद सावदा जि. जळगाव येथून समोर आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील सावदा नगर परिषदेच्या व्यापारी संकुलात जळगाव येथील 31 वर्षीय तक्रारदार यांचा एक गाळा आहे. तो गाळा सध्या श्री महालक्ष्मी पतसंस्थेच्या (Shree Mahalakshmi Patsanstha Yaval) कब्जात आहे. सदर व्यापारी गाळा व गाळ्याची अनामत रक्कम तक्रारदार यांच्या नावे वर्ग करून देण्यासाठी सखाराम कडू ठाकरे (sakharam kadu thackeray) यांनी तक्रारदार यांच्याकडे 5 लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. सखाराम कडू ठाकरे हे सहकार विभागात विशेष लेखा परीक्षक, सहकारी संस्था, (प्रक्रिया) धुळे अति. कार्यभार विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था (भूविकास बँक) जळगाव तथा अवसायक, श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड यावल म्हणून कार्यरत आहेत. (Shree Mahalakshmi Patsanstha Yaval Avsayak Sakharam Kadu Thackeray)
विशेष लेखापरीक्षक सखाराम कडू ठाकरे हे यावलच्या श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे अवसायक म्हणून कार्यरत होते. तक्रारदार याला व्यापारी गाळा व गाळ्याची अनामत रक्कम तक्रारदार यांच्या नावे वर्ग करून देण्यासाठी ठाकरे यांनी तक्रारदाराकडे 16 ऑगस्ट 2023 रोजी पाच लाख रूपये लाचेची मागणी केली होती. तशी तक्रार धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.
धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 17 ऑगस्ट 2023 रोजी पंचासमक्ष लाच पडताळणी केली. त्यानंतर करण्यात आलेल्या सापळा कारवाईत विशेष लेखापरीक्षक तथा अवसायक सखाराम कडू ठाकरे यांना पाच लाख रूपयांची लाच स्विकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ठाकरे यांच्याविरुद्ध धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे सहकार विभागात मोठी खळबळ उडाली आहे. अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
ही धडाकेबाज कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील (Dhule ACB DYSP Abhishek Patil) यांच्या टीमने पार पाडली. सापळा कारवाईच्या पथकात पोलिस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलिस निरीक्षक रूपाली खांडवी, पोलिस हवालदार राजन कदम, शरद काटके, पोलिस शिपाई संतोष पावरा, रामदास बारेला, गायत्री पाटील, प्रशांत बागुल, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, चालक पोहवा सुधीर मोरे यांचा समावेश होता.
यशस्वी सापळा कारवाई
युनिट -ला.प्र.वि. धुळे
तक्रारदार- पुरुष, 31 वर्ष. रा. जळगाव.
आलोसे – सखाराम कडू ठाकरे, वय- 56 वर्ष, पद – विशेष लेखा परीक्षक, सहकारी संस्था, (प्रक्रिया) धुळे अति. कार्यभार विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था (भूविकास बँक) जळगाव संस्था, जळगाव तथा अवसायक, श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड यावल जि जळगाव सध्या राहणार 11, राधेय को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी पाचोरा जिल्हा जळगाव
लाचेची मागणी- पाच लाख रुपये, दिनांक 16/08/2023
लाच स्वीकारली – पाच लाख रूपये, दिनांक 17/08/2023
लाचेचे कारण
नगर परिषद सावदा जि. जळगाव येथील व्यापारी संकुलातील श्री महालक्ष्मी पतसंस्थेच्या कब्जात असलेला व्यापारी गाळा व गाळ्याची संबंधित अनामत रक्कम तक्रारदार यांचे नावे वर्ग करून देण्यासाठी यातील आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष 5,00,000/- (पाच लाख) रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम 5,00,000/- रुपये यातील आलोसे यांनी पंचांसमक्ष स्वीकारल्याने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे विरुद्ध धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी – सचिव, सहकार विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई.
सापळा अधिकारी – अभिषेक पाटील, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे.
संपर्क क्रमांक – 8888881449
सापळा पथक – पोनि हेमंत बेंडाळे, पोनि रूपाली खांडवी, पो. हवा. राजन कदम, शरद काटके, पो. शि. संतोष पावरा, रामदास बारेला, गायत्री पाटील, प्रशांत बागुल, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, चालक पोहवा सुधीर मोरे सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे पथक.
मार्गदर्शक
श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर – पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र, नाशिक संपर्क क्रमांक – +919371957391
मा. श्री. माधव रेड्डी – अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक. संपर्क क्रमांक – 9404333049
नरेंद्र पवार – वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ,ला.प्र.वि. नाशिक. संपर्क क्रमांक – +919822627288.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा.