Dhule Sucied Case : एकाच कुटुंबातील चौघा जणांची आत्महत्या, धुळ्यातील धक्कादायक घटनेने महाराष्ट्र हादरला

Dhule Sucied Case : महाराष्ट्रात सामुहिक आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नाशिकमध्ये एकाच कुटुंबातील तिघा जणांनी आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील चौघा जणांनी आत्महत्या केली आहे. या घटनेने महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना धुळ्यातील प्रमोद नगर भागात घडली आहे.

Dhule Suicide Case, Suicide of four members of same family, incident in Dhule shook Maharashtra, Pravin Mansingh Girase,Deepa Pravin Girase, Mitesh Girase, Soham Girase,

धुळे शहरातील प्रमोद नगर भागात वास्तव्यास असलेले फर्टिलायझर दुकानदार प्रवीण गिरासे हे मंगळवारी मुलाच्या ॲडमीशनसाठी मुंबई जाणार होते. याची कल्पना त्यांनी शेजाऱ्यांना दिली होती. तेव्हापासून त्यांच्या घराचा दरवाजा बंद होता. त्यामुळे नागरिकांना वेगळीच शंका आली होती. त्यातच प्रविण गिरासे यांची बहिण सकाळी त्यांच्या घरी आली होती. त्यावेळी त्यांना दरवाजा उघडला असल्याचे दिसताच त्या तडक घरात गेल्या, मात्र समोर दिसलेलं दृश्य त्यांच्या पायाखालची जमिन सरकावणारं ठरलं, बेडवर चौघांचे मृतदेह पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हे पाहून त्यांनी टाहो फोडला.

प्रविण गिरासे यांच्या बहिणीचा रडण्याचा आवाज ऐकून शेजारचे नागरिक गिरासे यांच्या घराकडे धावले. गिरासे कुटुंबातील चौघा सदस्यांचे मृतदेह पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. गिरासे कुटुंबाने आत्महत्या केल्याच्या घटनेचा उलगडा झाला. एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली. ही घटना उघडकीस येताच धुळ्यात मोठी खळबळ उडाली.

मुलाच्या ॲडमीशनसाठी मुंबईला जाणार असल्याचे शेजाऱ्यांना सांगुन मुंबईला न जाता घरातच कीटकनाशक प्राशन करून प्रविण मानसिंग गिरासे, पत्नी दीपा प्रवीण गिरासे, मुलगा मितेश प्रवीण गिरासे व दूसरा मुलगा सोहम प्रवीण गिरासे या चौघा जणांनी सामुहिक आत्महत्या केली. ही घटना मयत प्रवीण गिरासे यांची बहिण त्यांच्या घरी आल्यामुळे उघडकीस आली. गिरासे कुटुंबातील चौघा जणांनी आत्महत्या केल्याची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. आई-वडिलांनी दोन मुलांसह आत्महत्या का केली ? ही आत्महत्या आहे की घातपात ? याचा पोलिसांकडून वेगाने शोध घेतला जात आहे.

नाशिकमध्ये बॉश कंपनीच्या कर्मचाऱ्याची कुटुंबासह आत्महत्या

नाशिकमधील गौळने गावातील बॉश कंपनीत काम करणाऱ्या एकाने पत्नी व मुळीसह आत्महत्या केली. विजय सहाने असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना बुधवारी उघडकीस आली होती. सहाने यांनी पत्नी व ९ वर्षांच्या मुलीसह आत्महत्या केली.