मुंबई – महाराष्ट्रातील गावपातळीवर कोरोना उपचार व सोयी-सुविधा बाबत अचूक मार्गदर्शन सेवा टेलिफोनवर चोवीस तास देण्याचा उपक्रम देशातील ख्यातनाम समाजसेवी संस्था “आपका डॉक्टर” व डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रने हाती घेतला आहे. या उपक्रमाची घोषणा संघटनेचे अध्यक्ष राजा माने व आपका डॉक्टरचे कार्यकारी संचालक शंकर मांजरे यांनी केली.
तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टर्सची टीम तयार करण्यात आली असून खेड्या-पाड्या पर्यंत ही सेवा कोरोनाग्रस्त आणि सर्वांसाठी टेलिफोनवर देण्यात येईल, असे शंकर मांजरे यांनी सांगितले.डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना या मोफत आणि विश्वासार्ह सेवेचा फायदा राज्यातील लोकांनी घ्यावा यासाठी प्रयत्न करीत आहे.ज्यांना या सुविधेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी या 8181812789 क्रमांकावर संपर्क साधावा असे अवाहन डिजीटल मिडीया संपादक पत्रकार संघटनेचे जामखेड तालुकाध्यक्ष सत्तार शेख यांनी केले आहे