Dnyanaradha Multistate news : ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा

Dnyanaradha Multistate news : ज्ञानराधा मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या विरोधात अनेक छोट्या गुंतवणूकदारांच्या आणि शेतकरी सभासदांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून या विषयासंदर्भात लिक्विडेटर (liquidator) नेमण्याचे निर्देश दिले आहेत. (Dnyanaradha Multi State Co-operative Credit Society)

Dnyanaradha Multistate news , Big relief from central government to the depositors of Dnyanaradha Multistate

ज्ञानराधा’मुळे शेतकरी, कामगार, कष्टकरी, छोटे व्यापारी असे ग्रामीण भागातील गुंतवणूकदार अडचणीत आहेत. याबाबत तक्रारींची संख्या मोठी असल्याने यावर केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी तातडीच्या बैठका घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. या बैठकीस आमदार नारायणची कुचे, आमदार मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांच्यासह केंद्रीय सहकार मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते. (Dnyanaradha Multistate news)

MSCS कायदा 2002 च्या कलम 86 अंतर्गत सोसायटी बंद करण्याची नोटीस सदर सोसायटीला 15 दिवसांच्या आत आक्षेप असल्यास सादर करण्यासाठी देण्यात येत आहे. अधिनियमाच्या कलम 89 अंतर्गत या प्रकरणात एका लिक्विडेटरची नियुक्ती अधिनियमाच्या नियम 28 आणि 29 नुसार सोसायटीच्या दायित्वांचे वितरण करण्यासाठी केली जाईल. (Dnyanaradha Multistate news)

प्रस्तुत लिक्विडेटर सोसायटीच्या मालमत्तेचे मूल्यांकन करेल आणि मालमत्तांच्या उपलब्धतेनुसार सोसायटीच्या सदस्यांना/ठेवीदारांना टप्प्याटप्प्याने त्यांची रक्कम परत करेल. यामुळे समाजातील गरीब सभासद आणि शेतकऱ्यांचा त्रास कमी होण्यास आणि त्यांच्या कष्टाने कमावलेले पैसे परत मिळण्यास मदत होईल. (Dnyanaradha Multistate news)

Dnyanaradha Multistate news , Big relief from central government to the depositors of Dnyanaradha Multistate

मराठवाड्यातील उद्योग क्षेत्रात बडे प्रस्थ असलेल्या सुरेश कुटे यांची ज्ञानराधा मल्टीस्टेट पथसंस्था नोव्हेंबर 2023 मध्ये अडचणीत आली. या पतसंस्थेवर प्राप्तिकर विभागाच्या छाप्यानंतर तीन लाख 70 हजार ठेवीदार, खातेदारांचे 3700 कोटी रुपये या पतसंस्थेत अडकले आहेत. (Dnyanaradha Multistate news)

या प्रकरणात या पतसंस्थेवर 42 हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या 50 शाखांचे मागच्या वर्षीचा ऑक्टोबर महिन्यापासून आर्थिक व्यवहार ठप्प असल्याचं सांगितलं जातंय. ज्ञानराधा मल्टीस्टेट च्या महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील इंदोर आणि अन्य ठिकाणी 50 शाखा असून साडेसहा लाख खातेदार आहेत. (Dnyanaradha Multistate news)

 हजारो ठेवीदारांच्या ठेवी बुडवून हाँगकॉंगला पळवल्याचा ठपका असणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉ ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीवर केंद सरकारनं महत्वाच्या सूचना केल्या आहेत.गुंतवणूकदारांच्या अनेक तक्रारींची गंभीर दखल करत घेत या पतसंस्थेसाठी लिक्विडेटर नेमण्याचे निर्देश केंद्र सरकरने दिले आहेत. (Dnyanaradha Multistate news)

ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेत अनेक सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत. गुंतवणूकदाराच्या तक्रारीवरून ज्ञानराधाचे सर्वेसर्वा सुरेश कुटे सध्या कोठडीत आहेत. (Dnyanaradha Multistate news)