जामखेड टाइम्स वृत्तसेवा । आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या NMMS Exam या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत जामखेड येथील प्रेस फोटोग्राफर तथा जामखेड तालुका मीडीया क्लबचे सदस्य राजेश भोगील यांची कन्या ज्ञानेश्वरी भोगील हिने घवघवीत यश संपादन केले आहे.
ज्ञानेश्वरी भोगील ही इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे. तीने आठवीत असताना NMMS Exam ही राष्ट्रीय शिष्यवृत्ती परिक्षा दिली होती. त्याचा आज निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत तीने मोठे यश संपादन केले आहे.ज्ञानेश्वरी ही अतिशय हुशार विद्यार्थ्यीनी आहे.
ज्ञानेश्वरी हिने आजादी का अमृतमहोत्सव आयोजित वक्तृत्व स्पर्धेत शालेयस्तर 2 रा तर तालुका स्तरावर 3 रा क्रमांक पटकावला होता. या स्पर्धेसाठी आझादी का अमृत महोत्सव काय कमवले आणि काय गमवले हा विषय होता. यावर तीने प्रभावी मांडणी केली होती.
ज्ञानेश्वरी भोगील ही विद्यार्थ्यीनी नवीन मराठी शाळेत शिक्षण घेत आहे. याच शाळेतील आणखीन पाच विद्यार्थ्यांनी NMMS EXAM परिक्षेत यश संपादन केले आहे. यामध्ये सानिया मतीन आतार, अभिषेक सोमनाथ निमोणकर, ओम दादाभाऊ डूचे, आर्यन प्रकाश त्रिभुवन, अथर्व महेश काथवटे यांचा विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.