Dr Kailash Rathi Nashik : डाॅ कैलास राठी यांच्यावर ‘या’ कारणावरून प्राणघातक हल्ला

Dr Kailash Rathi Nashik : महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या डाॅ कैलास राठी हल्ला प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्वाचे धागेदोरे लागले आहे.डाॅ कैलास राठी यांच्यावर प्राणघातक हल्ला (Attack) कोणत्या कारणातून झाला याचा उलगडा करण्यात पंचवटी पोलिसांना यश आले आहे. पंचवटीतील सुयोग हॉस्पिटलचे (Suyog Hospital Panchvati Nashik) संचालक डॉ. कैलास राठी यांच्यावर त्यांच्या हॉस्पिटलच्या माजी पीआरओच्या पतीने आर्थिक वादातून (financial disputes) जीवघेणा हल्ला केल्याचे समोर आले आहे.

Dr Kailash Rathi Nashik, attack on Dr Kailash Rathi for this reason, financial disputes, Suyog Hospital Panchvati Nashik,

डॉ. कैलास राठी यांच्याकडे रोहिणी राजेंद्र मोरे या पीआरओ म्हणून काम करीत होत्या. सन 2022 मध्ये डॉ. राठी यांची रोहिणी यांचे पती राजेंद्र मोरे यांच्यासमवेत ओळख झाली. काही काळानंतर त्यांनी मोरे यांच्या माध्यमांतून म्हसरूळ परिसरात एका जमिनीचा व्यवहार केला होता. गत दीड वर्षात डॉ. राठी यांनी मोरेला अनेक वेळा व्यवहारापोटी पैसे दिले होते. या पैशांसाठी राठी यांनी त्याच्याकडे तगादा लावला होता.

दरम्यान, राठी यांनी रोहिणी मोरे यांना कामावरून काढून टाकले होते. डॉक्टर आपली बाहेर बदनामी करीत आहेत, असा संशय आल्याने राजेंद्र मोरे याच्या मनात डॉक्टरांविषयी प्रचंड राग निर्माण झाला. काल रात्री तो डॉक्टरांशी चर्चा करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आला. दोघांमध्ये चर्चा सुरू असताना त्यांचे शाब्दिक वाद झाले. त्यानंतर मोरे याने डाॅ राठींवर कोयत्याने सपासप वार केले.राठी कॅबिनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते.या घटनेनंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ प्राथमिक उपचार सुरू केले.मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने रात्री राठी यांना अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

दरम्यान घटनेनंतर राजेंद्र चंद्रकांत मोरे हा फरार झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज माध्यमातून त्याचा शोध सुरू केला आहे. सुयोग हॉस्पिटलचे संचालक राठी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचे समजताच घटनास्थळी परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, पंचवटी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्यासह गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली.