Dr. Kailash Rathi Nashik : डाॅ कैलास राठी हल्ला प्रकरणात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Dr. Kailash Rathi Nashik : नाशिक बाजार समितीच्या आवारातील सुयोग हाॅस्पीटलचे (Suyog Hospital Nashik) संचालक डाॅ कैलास राठी (Dr Kailash Rathi) यांच्यावर प्राणघातक हल्ला (Attack) करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनला (Panchvati Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक देवाण घेवाणीच्या वादातून ही घटना घडल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी डाॅ कैलास राठी (Dr Rathi Nashik )यांच्या पत्नी डाॅ रीना राठी (Dr Reena Rathi) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

Dr. Kailash Rathi Nashik, Dr. Kailash Rathi assault case filed in Panchvati police station, Dr. Reena Rathi, latest news nashik,

नाशिकमधील डाॅ कैलास राठी यांच्यावर राजेंद्र मोरे (Rajendra More) याने 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात मोरे याने डाॅ राठी यांच्यावर धारदार कोयत्याने 19 वार केले होते. हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. मन विचलित करणाऱ्या या घटनेमुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती. नाशिकमधील वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये घबराट पसरली होती. प्रसिध्द डाॅक्टरवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे पोलिस यंत्रणेने आरोपीला बेड्या ठोकण्यासाठी वेगाने मोहिम राबवली. (Dr. Kailash Rathi Nashik)

नाशिकच्या पंचवटी येथील सुयोग हॉस्पिटलमधील डाॅ कैलास राठी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याची घटना घडली होती. या घटनेतील हल्लेखोर राजेंद्र मोरे हा घटनेनंतर फरार झाला होता. 24 तासाच्या आत त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पंचवटी पोलिसांच्या पथकाने आडगाव नाका परिसरातील संतोष टी पाँईट येथून राजेंद्र मोरे याला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सहाय्यक निरीक्षक विलास पडोळकर, मिथुन परदेशी, फरताळे, अशोक काकड, संतोष जाधव, राजेश सोळसे, यतीन पवार, श्रीकांत कर्पे, युवराज गायकवाड यांच्या पथकाने सापळा रचून केली. (Dr. Kailash Rathi Nashik)

दरम्यान, डाॅ कैलास राठी यांच्यावर पत्नी डाॅ रीना राठी यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दाखल फिर्यादीत म्हटले आहे की, पंचवटीतील सुयोग हॉस्पिटलचे संचालक डॉ. कैलास राठी यांच्याकडे रोहिणी.राजेंद्र मोरे ही 2018 साली अकाउटंट म्हणून काम करीत होती. हिशोबात 5 ते 6 लाखांची तफावत आढळून आल्याने तिला कामावरून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर 4 वर्षाने तिने पुन्हा डाॅ राठी यांची भेट घेतली. पुन्हा नोकरीवर घेण्याची विनंती केली. त्यानंतर पुन्हा कामावर रूजू झाली. (Dr. Kailash Rathi Nashik)

डाॅ कैलास राठी यांच्या विविध ठिकाणी असलेल्या जमिनींशी निगडीत कामे करण्याची जबाबदारी तिचावर देण्यात आली होती. त्यावेळी कामाच्या नावाखाली तिने डाॅ राठी यांच्याकडून 12 लाख रूपये घेतले. मात्र हे पैसे कामासाठी वापरले नाही. ज्या कामासाठी पैसे घेतले ते काम केलेच नाही. त्यामुळे डाॅ राठी यांनी मोरे दाम्पत्याकडे असलेल्या 18 लाखांची मागणी केली. वेळोवेळी पैसे परत करतो, असे सांगितले. मात्र, त्यानंतरही पैसे परत दिले नाहीत. शुक्रवारी रात्री नऊला संशयित मोरे हा डॉ. राठी यांना रुग्णालयात भेटण्यासाठी आला. दोघांमध्ये वाद झाला. केबिनमध्ये डॉ. राठी फोनवर बोलत असताना मोरे याने कोयता काढून त्यांच्या डोक्यावर व गळ्यावर असे एकूण 19 वार केले आणि घटनास्थळावरून फरारी झाला. (Dr. Kailash Rathi Nashik)

दरम्यान, राठी यांनी रोहिणी मोरे यांना कामावरून काढून टाकले होते. डॉक्टर आपली बाहेर बदनामी करीत आहेत, असा संशय आल्याने राजेंद्र मोरे याच्या मनात डॉक्टरांविषयी प्रचंड राग निर्माण झाला. आर्थिक देवाण घेवाणीच्या वादातून आरोपी राजेंद्र मोरे याने डाॅ कैलास राठी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. पोलिसांना राजेंद्र मोरे याला अटक केली आहे. पुढील तपास पंचवटी पोलिस करत आहेत.डाॅ कैलास राठी यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अपोलो रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती पंचवटी पोलिसांनी दिली. (Dr. Kailash Rathi Nashik)