Dr Pratiksha Gaware : ऑपरेशन थिएटरमधून बाहेर येताच डॉ. प्रतीक्षाने घेतला टोकाचा निर्णय, धक्कादायक माहिती उघड !
छत्रपती संभाजीनगर : डॉ. प्रतिक्षा गवारे आत्महत्या प्रकरणात (Dr. Pratiksha Gaware suicide case) आता एक नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी प्रतिक्षा ही रुग्णालयाच्या ऑपरेशन थिअटरमध्ये होती. त्यावेळी आरोपी पतीने तिला वारंवार फोन केले.ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आल्यानंतर प्रतिक्षाने आरोपीला फोन केले, मात्र त्याने तिचे कॉल घेतले नाही. त्यानंतर पीडितेने त्याला मेसेज टाकून हा शेवटचा असल्याचे सांगितले व आत्महत्या केली.आत्महत्येपुर्वी प्रतिक्षाने सात पानी सुसाइड नोट लिहली होती. (Dr Pratiksha Pritam Gaware)
लग्नाच्या अवघ्या 4 महिन्यातच पतीच्या त्रासाला कंटाळून डाॅ प्रतीक्षा प्रीतम गवारे (Dr Pratiksha Pritam Gaware) या 26 वर्षीय विवाहित डाॅक्टर तरूणीने आत्महत्या केली होती. (Dr Pratiksha Gaware Aurangabad News) या प्रकरणी प्रतिक्षाचे वडील प्रकाश बाबुराव भुसारे (रा. देवानगरी) यांच्या फिर्यादीवरून पती डॉ. प्रितम गवारे याच्यावर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत या प्रकरणातील आरोपी पती प्रितम शंकर गवारे (२६, रा. करंजखेडा ता. कन्नड ह.मु. प्रफुल्ल हौ.सो. बजरंगचौक) याला अटक केली.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता, सहायक सरकारी वकील सय्यद शेहनाज यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिले की, आरोपीने प्रतिक्षाला मॅसेज व कॉल करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याने त्याचा मोबाइल हस्तगत करायचा आहे. मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या अनुषंगाने आरोपीची चौकशी करायची आहे. प्रतिक्षाला आरोपींनी हुंडास्वरुपात पैशांची मागणी असून यात कोणाचा सहभाग आहे याचाही तपास करायचा आहे.
संसार आणि नवऱ्याकडून प्रत्येक मुलीच्या काही कल्पना असतात. पण अनेक वेळात या स्वप्नांना तडा जातो. असंच काहीस प्रतीक्षासोबत घडलं. डाॅक्टर पतीसोबत लग्न करून सुखाचा संसार थाटण्याचे, खूप मोठी गायनोकोलॉजिस्ट होण्याचे स्वप्न बघितलेल्या प्रतिक्षा गवारे या तरूणीने डाॅक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलत गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. प्रतिक्षाने मृत्यूपूर्वी सातपानी पत्र लिहले आहे. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या पत्रात प्रतिक्षा काय म्हणाली आहे? पाहूयात. (dr pratiksha gaware news in marathi)
प्रतिक्षा पत्रात म्हणाली की..!
Dear Aaho..
खूप प्रेम केलं हो तुमच्यावर, जिवापाड प्रेम केलं. स्वतःला विसरुन गेले तुमच्यासाठी. माझ्यासारख्या हसत्या, खेळत्या मुलीला त्रास देऊन मंद करुन टाकलं तुम्ही. एका स्वावंलबी, Ambitious मुलीला Dependent बनवलं तुम्ही. खूप स्वप्नं घेऊन लग्न केलं होतं तुमच्याशी की हे मला खूप जीव लावतील. काळजी करतील, करिअरमध्ये सपोर्ट करतील. आपली छोटीशी फॅमिली असेल. तुम्हाला मुलगा हवा होता, त्यासाठीच तयारी करत होते मी. गोंडस बाळ असतं आपलं तर ही वेळ तुम्ही माझ्यावर आणली नसती. तुम्ही सांगितलं म्हणून मी सगळं सोडलं मी. मित्र मैत्रिणी, नातेवाईक, आई वडिलांशी बोलल्यावर तुम्हाला राग यायचा म्हणून त्यांच्याशीही जास्त बोलत नव्हते. पण तरीही तुमचं पोट भरलं नाही. मोबाइल बदल म्हणाले, बदलला. नंबर बदल म्हणून वाद घातले, त्यासाठीही तयार झाले. तरीही तुमचे डाऊट संपले नाहीत. सतत माझ्या कॅरेक्टरवर संशय घेत आलात. पण देवाशपथ सांगते मी तुमच्याशी प्रामाणिक होते आणि राहिले. माझ्या चारित्र्यात काहीच खोट नाही.
सासू-सासऱ्यांची काळजी घेतली, कधी उलटसुलट बोलली नाही. त्यांनी पण मला जीव लावला. पण माझ्या कर्तव्याला तुम्ही दिखावा करते, असे म्हटले. मला त्याचं फार वाईट वाटलं म्हणून काल देवाला जाताना मम्मी पप्पांना कॉल केला नाही. मला पटत नव्हतं पण मी कंट्रोल केलं. तुमच्यावर मी लग्नाअगोदर पैसा खर्च केला. तरी तुम्ही त्यातले पैसे आईवडिलांना लग्नाच्या खर्चासाठी दिले म्हणून वाद घातले. तो पैसा मी माझ्या कष्टाने आणि आईवडिलांच्या साथीने कमावला. मला खूप मोठी गायनोकोलॉजिस्ट व्हायचं होतं. पण सगळं पाण्यात बुडवलं तुम्ही त्रास देऊन. शेवटी एवढंच म्हणेल, माझ्या आईवडिलांना मी नसले तरी कुणाल आहे. पण तुम्ही एकटे आहात.सासू सासऱ्यांना नीट सांभाळा. त्यांच्यावर चिडचिड करत जाऊ नका. आय लव्हू यू सो मच. बाय. यू आर अ फ्री बर्ड नाऊ.
या पत्रात तिने आपल्या वेदना कवितेतूनही मांडली आहे.
माझ्या मनीचे दुःख सारे कधी तु जाणवलेच नाही
पावसात लपणारे अश्रू माझे तुला कधी दिसलेच नाही.
तुझ्याचसाठी हुरहुरणाऱ्या हृदयास तु पहिले नाही
तुझ्यासाठी झटणाऱ्या हातांना कधी चुंबले नाही
नशीब बांधले होते आपले, नाही त्यात षड्यंत्र काही
हा पण प्रेम होते आणि आहे (हे लिहून वाक्य खोडलं आहे)
दोष याला त्याला देण्यात कसला काही अर्थ नाही
मनीचे भाव मनाचे घाव याला काही महत्त्व नाही
तुझ्या नजरेत मी फक्त स्त्री आणखी काही नाही.
तुझ्याचपासून सुख माझे तुझ्याचसाठी सर्व काही
मी स्वत:ला हरवून आले, याचे मला दुःख नाही
तू फक्त जपावे मला याहून जास्त अपेक्षा नाही
तुझ्यासाठी मी सगळं करेल यात काही शंका नाही
तुम्ही गोड आहात दिसायला, गोड राहा आणि कधी थोडंसं जरी प्रेम केलं असेल माझ्यावर तर मला एक टाइट हग करुनच चितेवर ठेवा. बाकी आयुष्य मला विसरून आनंदाने जगा.
तुमचीच
प्रतीक्षा
दरम्यान लेकीच्या जाण्याने कोलमडून पडलेल्या वडिलांनी सिडको पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी हुंडाबळी, पत्नीला त्रास देण्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाताल आरोपी प्रीतम शंकर गवारे (Dr Pritam Shankar Gaware) हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
डॉ. प्रतीक्षाने लग्नानंतर अवघ्या चार महिन्यात गळफास घेऊन आयुष्य संपवलं. गायनॅकलॉजिस्ट होण्याचं स्वप्न तिने उराशी बाळगलं होतं. मात्र पती मानसिक त्रास देत असल्याने आणि छळ करत असल्याची माहिती तिने ७ पानांवर लिहिली आणि तिने आयुष्य संपवलं आहे.सात पानांची सुसाइड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली. त्यांनी आरोपी पती आणि त्याच्या कुटुंबियांवर कारवाई करण्यासाठी घर गाठलं मात्र घराला कुलूप लावलं होतं. आरोपीचा फोनही बंद होता. आरोपी फरार झाला असून त्याचा शोध घेत आहेत. तर आरोपीच्या घरातले देखील कुलूप लावून पसार झाले आहेत. आरोपी पती आणि कुटुंबियांचे फोन बंद असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
सुसाइड नोटमध्ये प्रतीक्षाने तिचा नवरा आपल्याला नेमका कसा त्रास देतो, कसा मानसिक छळ करतो याची माहिती तिने दिली आहे. पोलिसांनी सुसाइट नोट ताब्यात घेतली आहे. यामध्ये तिने संपूर्ण चार महिन्यात नेमकं पतीकडून कशी वागणूक मिळाली, जर घरच्यांना सांगितलं तर लग्न मोडण्याची धमकी देखील देण्यात आल्याचं तिने लिहिलं आहे.
प्रतीक्षाने लिहिलंय, ”मला जाब विचारला जातो, माझ्यावर नजर ठेवायला मित्रांना कॉल करणार होतो आता तुला पाहायला असं सांगतात. म्हणजे माझ्यावर तुमचा किती अविश्वास आहे ते लगेच दिसतं. मी कामाच्या ठिकाणीसुद्धा तुमच्या धाकात असते. सतत कुठे आहेस, तिथे काय करतेस, एवढा वेळ का झाला, कॉल नाही केला, बोलायचं नाहीय का असं सतत बोलून त्रास दिला.
माहेरच्यांना काहीही बोलतात, फर्निचरच्या पैशांवरुन भांडतात, जेव्हा मला NEET PG द्यायची होती तेव्हा अभ्यास करू दिला नाही. मी केलेल्या चुका मला ऐकवून माझी मेंटल हॅरासमेंट केली. कामात असताना कॉल केला नाही म्हणून रागवतात, नंतर बोलते म्हटल्यावर चिडतात. दिलेला त्रास घरी सांगितलास तर बघ आपलं नातं तुटेल अशी रोज धमकी द्यायचे आणि शांत बसवलं.” (dr pratiksha gaware news Today)