Dr Priyanka Nilesh Varkate Parbhani : MD डाॅक्टर पतीच्या छळास कंटाळून MBBS महिला डाॅक्टरने संपवले जीवन !
Dr Priyanka Nilesh Varkate Parbhani : उच्चशिक्षित कुटूंबात हुड्यांसाठी छळ होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यातून सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहीत महिला स्वता:ला संपवत आहेत, अशीच एक धक्कादायक घटना परभणी जिल्ह्यातून समोर आली आहे. या घटनेत MBBS डाॅक्टर असलेल्या डाॅ प्रियांका व्हरकटे (Dr Priyanka) या विवाहित तरूणीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या (Sucied) केली आहे. या घटनेने पालम (Palam Parbhani) शहरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दवाखाना बांधण्यासाठी माहेरहून एक कोटी रूपये आणावेत यासाठी मयत डाॅ प्रियांकाचा सासरच्या मंडळीकडून नेहमी छळ केला जायचा. मानसिक त्रास दिला जायचा, मयत प्रियांकाचा पती निलेश व्हरकटे हा MD डाॅक्टर आहेत. त्यांचा विवाह २०२२ मध्ये झाला होता. लग्नाच्या काही दिवसानंतर मयत प्रियंका यांना तिच्या सासरच्या मंडळीकडून माहेरहून 1 कोटी आणावेत यासाठी सतत त्रास देऊन दबाव टाकला जात होता. असा प्रियांकाटच्या कुटुंबियांचा आरोप आहे.
सासरच्या मंडळीकडून सातत्याने छळ केला जात असल्याने याप्रकरणी भरोसा सेलकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. पण तिथे तडजोड झाली नव्हती, प्रियांका ही माहेरी राहत असतानाही तिला सासरच्या मंडळीकडून फोन करून त्रास दिला जायचा. या त्रासाला कंटाळून प्रियांकाने राहती घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
या प्रकरणी मयत प्रियांकाचा डाॅक्टर पती निलेश व्हरकटे, राम व्हरकटे, सुनिता व्हरकटे, तेजस व्हरकटे, तनया व्हरकटे, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डाॅ प्रियांका व्हरकटे ह्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या, त्यांनी ही नोकरी मागील तीन महिन्यांपूर्वी सोडली होती. गंगाखेड तालुक्यातील कोदरी येथे त्या काम करत होत्या. प्रियांका यांचे पती डाॅ निलेश व्हरकटे हे एम डी डाॅक्टर असल्याची माहिती परभणी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.