Ram mandir Ayodhya : प्रभु श्रीराम मंदिराचे स्वप्न पुर्ण झाले, आता पुढे काय ? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आयोध्येत मोठे विधानं, म्हणाले…
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Ram mandir Ayodhya : आयोध्येतील भव्य राम मंदिराचे आज मोठ्या थाटामाटात लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी हा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी आज आपले प्रभू राम आले म्हणत देशवासियांना शुभेच्छा दिल्या.
“आज आपले राम आले आहेत. २२ जानेवारी हा दिवस वर्षानुवर्ष लक्षात राहिलं. आपले राम आता झोपडीत राहणार नाहीत, भव्य मंदिरात राहतील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. तसेच माझं शरीर अजूनही स्पंदीत असून, चित्त प्राणप्रतिष्ठेच्याच क्षणात लीन आहे,” असे म्हणत पंतप्रधान काही क्षण भावुक झाल्याचेही यावेळी पाहायला मिळाले. (Ram mandir Ayodhya)
या संबोधनादरम्यान, मोदींनी अयोध्येत भव्य राम मंदिर बांधून पूर्ण झालं. आता पुढे काय? असा सवाल करत उपस्थितांसमोर नव्या भारताचा एक संकल्प मांडला. आता आपण याच वेळेपासून पुढील एक हजार वर्षांनंतरच्या भारताची पायाभरणी केली पाहिजे. मंदिर निर्मितीपासून पुढे जाऊन आता आपण सर्व देशवासियांनी या घडीपासून एक समर्थ, सक्षम, भव्य, दिव्य भारताच्या निर्मितीची शपथ घेऊया, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. (Ram mandir Ayodhya)
मोदी म्हणाले की, आज अयोध्या भूमी आम्हा सर्वांना, प्रत्येक रामभक्ताला एक प्रश्न विचारत आहे. प्रत्येक भारतीयाला एक प्रश्न विचारत आहे. काही प्रश्न विचारत आहे. श्रीरामांचं भव्य मंदिर उभं राहिलं. आता पुढे काय? शतकांनुशतके ज्याची वाट पाहिली ते आज पूर्णत्वास गेले. आता पुढे काय? आजच्या या शुभघडीला जे दैवी आत्मे आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिले आहेत. आम्हाला पाहत आहेत, त्यांना आपण काय असाच निरोप देणार का? नाही, अजिबात नाही. (Ram mandir Ayodhya)
आज मला पूर्ण पवित्र मनाने वाटतं की, काल चक्र बदलत आहे. हा सुखद संयोग आहे की आम्हाला आमच्या पिढीला कालजयी पथाचे शिल्पकार म्हणून निवडलं गेलं. हजारो वर्षांनंतरची पिढी राष्ट्रनिर्माणाबाबतच्या आमच्या कार्याची आठवण काढेल. म्हणून मी सांगतो की हीच योग्य वेळ आहे. आता आपण याच वेळेपासून पुढील एक हजार वर्षांनंतरच्या भारताची पायाभरणी केली पाहिजे. मंदिर निर्मितीपासून पुढे जाऊन आता आपण सर्व देशवासियांनी या घडीपासून एक समर्थ, सक्षम, भव्य, दिव्य भारताच्या निर्मितीची शपथ घेऊया. रामाचे विचार मानसासोबत जनमानसामध्ये असणं हीच राष्ट्रनिर्मितीची पायरी आहे, असे मोदींनी सांगितले. (Ram mandir Ayodhya)