Hingoli Nanded Earthquake today : भर सकाळी मराठवाड्यातील अनेक भागात भूकंपाचे धक्के, हिंगोली नांदेड आणि परभणीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण !

Hingoli Nanded Parbhani Earthquake News today : काही दिवसांपूर्वी नांदेड शहरात भूकंपाचे धक्के जाणवल्याची घटना ताजी असतानाच मराठवाड्यात पुन्हा एकदा भूकंपाचे (Earthquake in india) धक्के जाणवले आहेत. सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी मराठवाड्यातील (Marathwada Earthquake News) नांदेड, हिंगोली, परभणीचा परिसर भूकंपाने हादरला. हिंगोलीत दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.भूकंपाच्या घटनेने मराठवाडा हादरून गेला आहे. (Earthquake in maharashtra Today)

Earthquake shocks in many parts of Marathwada in the morning, atmosphere of fear among citizens of Hingoli, Nanded and Parbhani, Earthquake latest news today, panic among citizens,

आज सकाळी मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली आणि परभणी या तीन जिल्ह्यातील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. भर सकाळी भूकंप झाल्याने नागरिक प्रचंड घाबरले होते. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिक घराबाहेर पडले. या भूकंपाची तीव्रता काही भागात 4.2 तर काही भागात 4.5 रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचे धक्के मराठवाड्यातील अनेक भागाला बसले. काही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये भूकंप झाला होता. आता याच भागात पुन्हा भूकंप झाला. आज सकाळी नांदेडच्या उत्तर भागालाही भूकंप झाला. (Nanded Earthquake News today)

आज सकाळी मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर भागांत भूकंपाचे धक्के जाणवले.अनेकजण घाबरुन घराबाहेर आले. तर, नांदेडच्या उत्तर भागात भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती मिळत आहे. भूकंपाची तीव्रत रिश्टर स्केलवर 4.2 अशी नोंद करण्यात आली आहे. याआधी मार्चच्या पहिल्या आठवड्यातही भूकंपाचे धक्के जाणवले होते.

हिंगोली जिल्ह्यात दोन भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात असून 3.6 तर 4.5 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के असल्याचे हिंगोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले आहे. तर, विशेष म्हणजे मराठवाड्यात 1993 नंतरचे हे सर्वात मोठे धक्के असल्याची माहिती मिळत आहे. (Hingoli Earthquake latest news today)

हिंगोली जिल्ह्यामध्ये आज सकाळी सहा वाजून नऊ मिनिटाच्या सुमारास भूकंपाचे दोन धक्के जाणवले आहेत. या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर असून याची तीव्रता हिंगोली, परभणी, नांदेड या तीनही जिल्ह्यातील गावांना जाणवली आहे. सकाळी सहा वाजताच्या सुमारास झालेल्या या भूकंपामुळे अनेक घरांच्या भिंतीना छोट्या भेगा गेल्याची माहिती आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दांडेगाव येथील अनेक सिमेंटच्या घरांना तडे गेले आहेत. (Hingoli Earthquake Today)

सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी भूकंपाच पहिला धक्का बसला. रिश्टल स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.5 एवढी मापण्यात आली. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा आणि दांडेगावच्या उत्तर भागातील रामेश्वर तांड्याच्या उत्तर भागामध्ये जमिनीच्या आत 10 किलोमीटरवर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे दिसून आले.

पहिल्या धक्क्यातून नागरिक सावरत नाही तोच बरोबर 11 मिनिटांनी अर्थात सकाळी 6 वाजून 19 मिनिटांनी भूकंपाचा दुसरा धक्का बसला. भूकंप मापण यंत्रावर याची नोंद 3.6 रिश्टल स्केल एवढी झाली. या भूकंपाचा केंद्रबिंदू तीन किलोमीटर दक्षिणेला असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या रामेश्वर तांड्याच्या दक्षिण भागात असल्याचे दिसून आले. या भूकंपाची खोली 10 किलोमीटर असल्याचे दिसत आहे.

हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून भूगर्भातून आवाज येणे, कमी-अधिक प्रमाणात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. आज गुरुवारी सकाळी जिल्ह्यातील कळमनुरी, औंढा नागनाथ, हिंगोली व वसमत तालुक्यातील अनेक गावांना सकाळी भूकंपाचा हादरा बसला. या भूकंपाच्या धक्क्याने नागरिक मोठ्या संख्येने घराच्या बाहेर पडले. सुदैवाने या धक्क्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अनेक घरांना तडे गेले असून काही ठिकाणी घरांची पडझड झाल्याचेही वृत्त आहे.

हिंगोली शहरातील अनेक भागात भूगर्भातून सौम्य आवाज झाल्याचे जाणवले. तर हिंगोली जिल्ह्यातील 700 हून अधिक गावांमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला आहे. यामध्ये कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर, पाळोदी, कांडली, बोलक्याची वाडी, कवडा, पोतरा, वडगाव, बोथीमाळ, धावंडा, जांब, सिंदगी, पावनमारी, येडशी, डोंगरगाव सापळे या भागात जाणवले आहेत.

तर औंढा नागनाथ तालुक्यातील काकड धाबा पिंपळदरी सोनवाडी फुलदाबा कुपटी, पांगरा शिंदे, वसमत तालुक्यातील हट्टा शिरड शहापूर रंजे अडगाव माटेगाव ब्राह्मणगाव सावंगी आधी गावांमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही

नांदेड शहर आणि जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये आज सकाळी सहा वाजून 8 मिनिटांनी आणि सहा वाजून 19 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने भितीने नागरिक घराबाहेर पडले. नांदेडच्या ‘सिडको-हडको’ परिसरात देखील सकाळी सहा वाजून 5 मि. ते सहा वाजून आठ मिनिटांदरम्यान भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला (Nanded Earthquake Today)

महाराष्ट्रातील नांदेड आणि परभणी जिल्ह्याच्या काही भागात गुरुवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. सुदैवाने भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. earthquake in Hingoli नांदेडमध्ये शहराच्या काही भागात आणि जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, नायगाव, देगलूर, बिलोली तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले. (Nanded Earthquake latest news today)

भूकंपाचं केंद्र हिंगोलीजवळ

हिंगोली जिल्ह्यात दोन भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात असून 3.6 तर 4.5 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज सकाळी सहा वाजून नऊ मिनिटाच्या सुमारास भूकंपाचे दोन धक्के जाणवले आहेत. या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर असून याची तीव्रता हिंगोली परभणी नांदेड या तीनही जिल्ह्यातील गावांना या लोकांची तीव्रता जाणवली आहे. या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सकाळी सहा वाजताच्या सुमारास झालेल्या त्यामुळे अनेक घरांच्या भिंतीना छोट्या भेगा गेल्याची माहिती आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीच वातावरण निर्माण झाला आहे. दांडेगाव येथील अनेक सिमेंटच्या घरांना तडे गेले आहेत. (Hingoli Earthquake News today)

भूकंप कसा होतो?

भूगर्भातील हालचालींमुळे प्रचंड प्रमाणात उर्जेचं उत्सर्जन होतं आणि त्याच्या ‘भूकंप लहरी’ तयार होतात. त्यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागाची हालचाल होते. त्यामुळे जमीन थरथरणं, हलणं, जमिनीला भेगा, कंपन होणं तसेच अचानक काही क्षण हादरणं यास भूकंप म्हणतात. भूकंपामुळे भूपृष्ठाचा भाग मागे-पुढे किंवा वर-खाली होतो. साहजिकच त्यामुळे भूगर्भात निर्माण होणारे धक्के आणि लाटा जमिनीच्या आत आणि वरच्या पृष्ठभागावर सर्व दिशांनी पसरतात. जमिनीखाली असलेल्या भूकंपाच्या उगमस्थानास भूकंपनाभी म्हणतात. भूकंपनाभीच्या अगदी वर, भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचा केंद्रबिंदू म्हणतात. तीव्र स्वरूपाच्या लाटा किंवा हादरे सर्वप्रथम या केंद्रालगत येऊन पोहोचतात, त्यामुळे तेथे हानीचे प्रमाण सर्वात जास्त असते. भूकंपाचे हादरे हे सौम्य किंवा तीव्र अशा दोन्ही स्वरूपाचे असू शकतात. पृथ्वीवर होणाऱ्या विध्वंसक भूकंपांपेक्षा सौम्य भूकंपांची संख्या खूपच जास्त असते. भूकंपालेख यंत्रांवर धक्क्यांची नोंद आपोआप होत राहते. (Earthquake in marathwada)

भूकंप झाल्यानंतर काय काळजी घ्यावी?

तुम्ही एखाद्या इमारतीत असताना भूंकपाचे तीव्र धक्के जाणवू लागले, तर तात्काळ एखाद्या मजबूत फर्निचरचा आसरा घेऊन त्याखाली जाऊन लपा. किंवा एखाद्या कोपऱ्यात उभे राहून तुमचा चेहरा आणि डोकं झाकण्याचा पुरेसा प्रयत्न करा. शक्य झाल्यास तात्काळ इमारतीतून बाहेर पडा आणि मोकळ्या मैदानात जाण्याचा प्रयत्न करा. तुम्ही एखाद्या वाहानात बसले असल्यास तात्काळ वाहन थांबवा आणि आतच बसून राहा. जर तुम्ही ढिगाऱ्याखाली अडकले असाल तर चुकूनही काडेपेटी जाळू नका. तसंच अजिबात हलण्याचा प्रयत्न करु नका. ढिगाऱ्याखाली अडकल्यानंतर एखाद्या पाईप किंवा भिंतीवर हळूहळू हात मारा. जेणेकरुन बचाव पथक तुमच्यापर्यंत पोहचू शकेल.(Nanded Hingoli Parbhani Earthquake News today)