Lalit Teckchandani ED : बांधकाम व्यावसायिक ललित टेकचंदानीच्या 22 ठिकाणांवर ईडीची धाड ; ईडीने जप्त केले कोट्यावधींचे घबाड ! 

Lalit Teckchandani Latest News : लोकांना घरे न देता त्यांची आर्थिक फसवणूक करणारा मुंबईतील प्रसिध्द बिल्डर ललित टेकचंदानी ईडीच्या रडारवर आला आहे. ईडीने टेकचंदानी यांच्या मुंबई आणि नवी मुंबईतील घर, ऑफिस आणि इतर 22 ठिकाणी केलेल्या छापेमारीत कोट्यावधींचे रोकड जप्त केली आहे.सुप्रीम कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्सच्या जागेवरही छापेमारी करण्यात आली आहे. या कारवाईत ईडीच्या हाती मोठे घबाड लागले आहे. ईडीच्या या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.

ED raids on 22 places of builder lalit teckchandani in Mumbai, 30 crore cash seized by Ed, lalit teckchandani latest news,

केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने 7 फेब्रुवारी रोजी सुप्रीम कन्स्ट्रक्शन वर छापेमारी केली होती. यावेळी इडीने 27 लाखांची रोकड, कोट्यावधींची एफडी आणि मालमत्तेची कागदपत्रे जप्त केले होते. ईडीने 22 ठिकाणी केलेल्या छापेमारीत कोट्यीवधींचे घबाड ईडीच्या हाती लागले आहे. यामध्ये  एकूण मालमत्तेची कागदपत्रे आणि 30 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे तळोजा आणि चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये तपास यंत्रणेने नोंदवलेल्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने पीएमएलए अंतर्गत कारवाई केली.

तळोजा, चेंबूर येथे गृहनिर्माण सोसायटी बांधण्याच्या नावाखाली बिल्डर टेकचंदानी आणि इतरांनी सुमारे 1700 ग्राहकांकडून 400 कोटी रुपये घेतल्याचे तपासात उघड झाले. ग्राहकांकडून घेतलेल्या पैशांच्या मोबदल्यात त्यांना ना सदनिका दिल्या ना पैसे परत केले. याच प्रकरणात ईडीने मोठी कारवाई हाती घेतली.

तपास यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार, 1700 लोकांकडून घेतलेले 400 कोटी रुपये टेकचंदानीने कुटुंबाच्या नावावर वेगवेगळ्या ठिकाणी जमीन खरेदीसाठी गुंतवले होते. यापूर्वीही मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अनेक घर खरेदीदारांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आणले होते. आर्थिक गुन्हे शाखेने शहरातील बांधकाम व्यावसायिक ललित टेकचंदानी याला फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या गुन्ह्यात अटकही केली होती.

अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण अनेक घर खरेदीदारांच्या कथित फसवणुकीशी संबंधित आहे. ते म्हणाले की, तळोजा येथील टेकचंदानी बांधकाम प्रकल्पात 36 लाख रुपये गुंतवल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. त्यांनी सांगितले की, कंपनीने त्यांना आश्वासन दिले होते की, हा प्रकल्प 2017 मध्ये तयार होईल, परंतु 2016 मध्ये त्याचे बांधकाम थांबले. अशा परिस्थितीत त्यांना ना फ्लॅट मिळाला ना त्यांचे पैसे परत मिळाले.

काय आहे प्रकरण?

ललित टेकचंदानी बांधकाम व्यावसायिक आहे. मुंबईतल्या बांधकाम क्षेत्रातलं एक मोठं नाव आहे. मात्र ग्राहकांची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा आता त्याच्यावर दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्याची याआधी याच प्रकरणी चौकशी केली होती. त्यानंतर अटकेची कारवाई केली. कलम 420 आणि 406 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.