Former Home Minister Anil Deshmukh arrested । ED चा दिवाळीत मोठा धमाका : माजी गृहमंत्री अनिल देशमुख अटकेत : मध्यरात्री ईडीने केली अटकेची कारवाई

जामखेड टाईम्स वृत्तसेवा  : Former Home Minister Anil Deshmukh arrested । 100 कोटी वसुलीच्या आरोपावरून ईडीच्या निशाण्यावर असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने मध्यरात्री अटक केली. (ED arrests at midnight) दिल्लीतून झालेल्या वेगवान हालचालीनंतर ही कारवाई करण्यात आली.

गेल्या अनेक दिवसांपासून अनिल देशमुख गायब झाले होते. न्यायालयाने दिलासा न दिल्याने ते काल ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. (Former Home Minister Anil Deshmukh arrested)

मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याप्रकरणी सुमारे ५ वेळा समन्स बजावूनही अनिल देशमुख ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. तब्बेत आणि वयाची कारणे देत अनिल देशमुख यांनी ईडीसमोर जाण्याचे टाळले, असे सांगितले जात आहे. सीबीआयने अनिल देशमुख यांच्या कार्यालय व घरावर पाचवेळा छापे टाकले. देशमुख यांनी आपल्यावरील कारवाई रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने बजावलेले समन्स रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला होता.

मुंबईतील ईडीचे अधिकारी सकाळी 11.30 वाजल्यापासून अनिल देशमुखांची चौकशी करत होते. देशमुखांसोबत त्यांचे वकील इंद्रपाल सिंह हे देखील ईडी कार्यालयात गेले होते. अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात आल्याचे कळताच दिल्लीच्या मुख्यालयात मोठ्या हालचाली सुरु झाल्या होत्या. सायंकाळी साडेसातच्या सुमारास अचानक दिल्लीहून ईडीचे सहसंचालक सत्यव्रत कुमार मुंबईत दाखल झाले आणि सारी सूत्रे वेगाने फिरली. (Former Home Minister Anil Deshmukh arrested)

अनिल देशमुख अनेक प्रश्नांना नकारार्थी उत्तरे देत होते. यामुळे देशमुख माहिती लपवत असल्याचा संशय ईडीच्या अधिकाऱ्यांना आला. त्यातच दिल्लीतील मोठा अधिकारी आल्याने अनिल देशमुखांच्या अटकेच्या कारवाईला वेग आला. अनिल देशमुख चौकशीला सहकार्य करत नसल्याने ईडीने त्यांना अटक करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. माजी गृहमंत्री देशमुख यांची दिवाळी ईडीच्या कोठडीत जाणार आहे. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. (Former Home Minister Anil Deshmukh arrested)

ED समोर चौकशीला जाण्याआधी अनिल देशमुख यांनी एक निवेदन जारी केले होते. काही प्रश्न उपस्थित केले होते. परंतू आता ED ने देशमुख यांच्यावर अटकेची कारवाई केल्याने महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.

देशमुख यांच्याबद्दलचा घटनाक्रम

मार्च २०२१ – परमबीर सिंह यांचे १०० कोटी वसुलीबाबतचे पत्र

५ एप्रिल रोजी अनिल देशमुख यांचा मंत्रीपदाचा राजीनामा

१४ एप्रिल रोजी अनिल देशमुख सीबीआय चौकशीला हजर ९ तास झाली होती चौकशी

५ जून रोजी हजर राहण्याचे पहिले समन्स

२५ जून रोजी देशमुखांच्या नागपूर व मुंबईतील घरावर छापे

२६ जून रोजी देशमुखा़ंना दुसरे समन्स

५ जुलै रोजी हजर राहणयाबाबत तिसरे समन्स

१६ जुलै रोजी देशमुखांची ४ कोटीची संपती जप्त केली (जप्तीमध्ये वरळीतील घर व उरणच्या धुतुम गावातील जमीनीचा समावेश)

१८ जुलै रोजी अनिल देशमुखांच्या नागपूरच्या काटोल येथील घरावर ईडीचे छापे

३०जुलै अनिल देशमुखने ईडी विरोधात सुप्रिम कोर्टत घेतली धाव

१६ आँगस्ट अनिल देशमुखाची याचिता सुप्रिमकोर्टाने फेटाळली

१८ आँगस्ट रोजी अनिल देशमुख यांना चौथं समन्स

आँगस्ट महिन्यातच ५वं समन्स बदावण्यात आलं

२ सप्टेंबर रोजी सीबीआयचा अनिल देशमुखांचा अहवाल झाला लिक

चौकशीला हजर रहात नसल्यामुळे ५ सप्टेंबर – ईडीची लूक ऑऊट नोटीस

३० आँक्टोंबर मुंबई उच्च न्यायालयाने ईडी विरोधात अनिल देशमुखाची याचिका फेटळली.

१ नोव्हेंबर अनिल देशमुख ईडी कार्यालयात चौकशीला ११ :३० वा वकिल इंद्रपाल सिंह सोबत हजर

१ नोव्हेंबर : मुंबई ईडी कार्यालयात दिल्लीचे वरिष्ठ अधिकारी दाखल

१ नोव्हेंबर: ईडीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जोरदार हालचालीनंतर अनिल देशमुख यांना मध्यरात्री अटक (Former Home Minister Anil Deshmukh arrested)