जामखेड टाइम्स वृत्तसेवा : १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी असल्यामुळे ईद ए मिलादच्या (Eid E Milad 2024) सार्वजनिक सुट्टीत बदल करण्याचा करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
अल्लाहचे अंतिम प्रेषित तथा इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती ‘ईद ए मिलाद’ म्हणून जगभरातील मुस्लिम बांधव साजरी करतात.भारतातही ईद ए मिलाद हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. (Eid E Milad)
मुस्लिम धर्मियांचा ईद ए मिलाद (Eid E Milad) हा पवित्र सण यंदा सोमवारी (१६ सप्टेंबर २०२४) आहे. या सणानिमित्त मुस्लिम बांधवांकडून जूलूस कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तत्पूर्वी यंदा ईद ए मिलाद व अनंत चतुर्थी एकत्र आले आहेत.
दोन्ही समाजात शांतता व सामाजिक ऐकोपा रहावा याकरिता सरकारने ईद ए मिलादच्या (Eid E Milad 2024) सार्वजनिक सुट्टीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. १६ सप्टेंबर रोजी असणारी ईद ए मिलादची सुट्टी १८ सप्टेंबर रोजी देण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक सरकारने जारी केले आहे. (Eid E Milad 2024)