(Eknath Khadse’s son-in-law Girish Chaudhary has been arrested by the ED ) ईडीचा फेरा एकनाथ खडसेंभोवती : जावाई अटकेत
पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील जमिन घोटाळ्याप्रकरणी अटक (Bhosari land scam)
मुंबई : ईडी राज्यात मोठ्या वेगाने सक्रीय झाली आहे. ईडीने राष्ट्रवादीभोवती आपला फास आवळण्याचा धडाका लावला आहे. आधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना टार्गेट केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना टार्गेट करण्यात आले आहे. ईडीचा फेरा खडसे परिवाराच्या पाठीमागे लागला आहे.(Eknath Khadse’s son-in-law Girish Chaudhary has been arrested by the ED )
भोसरी येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी (Bhosari land scam) एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना रात्री ईडीने अटक केली आहे. यामुळे एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसला आहे. भाजपचे ऑपरेशन लोटस राज्यात पुन्हा सक्रीय झाल्याचे संकेत यातुन मिळू लागले आहेत. ED’s turn is behind the Khadse family. Eknath Khadse’s son-in-law Girish Chaudhary has been arrested by the ED last night in connection with a land scam in Bhosari. This has come as a big shock to Eknath Khadse. This indicates that the BJP’s Operation Lotus has been reactivated in the state.
पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील जमिन घोटाळ्याप्रकरणी (Bhosari land scam) खडसे यांना युतीच्या सरकार काळात महसूल मंत्री पद गमवावे लागले होते. यानंतर खडसेंना ईडीने चौकशीला बोलावले होते. या चौकशीला खडसे सामोरे गेले होते. खडसे यांची मुलगी शारदा यांना देखील ईडीने चौकशीला बोलावले होते. यानंतर त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना चौकशीसाठी बोलावले होते. काल दिवसभर गिरीश चौधरी यांची चौकशी करण्यात आली. गिरीश चौधरी यांना ईडीने रात्री अटक केल्याचे आज सकाळी जाहीर केले. यामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.(Eknath Khadse’s son-in-law Girish Chaudhary has been arrested by the ED )
झोटिंग समितीने आपल्याला क्लिन चिट दिल्याचे खडसे यांनी सांगितले होते. मात्र, पदाचा गैरवापर करून खडसे यांनी भोसरी येथील जमिनीचा व्यवहार (Bhosari land scam) केल्याचा आरोप करण्यात आला होता. ही जमिन एमआयडीसीची (Bhosari MIDC)होती असे नंतर समोर आले. अनेकांच्या चौकश्या झाल्यानंतर जावई गिरीश चौधरी यांनाही मंगळवारी चौकशीसाठी बोलावले होते. (Eknath Khadse’s son-in-law Girish Chaudhary has been arrested by the ED )
या कारवाईवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मिटकरी म्हणाले १२ आमदारांचे निलंबन केल्यानंतरची ही भाजपाची प्रतिक्रिया आहे. असे काहीतरी होणारच होते. कारण ईडी ही भाजपाची प्रेयसी आहे. त्यांचा विरोधकांना नमविण्यासाठी वापर केला जातो. सीडी आता नाथाभाऊ समोर आणतील, त्याची वाट पाहूयात, असे सांगितले.(Eknath Khadse's son-in-law Girish Chaudhary has been arrested by the ED )