जामखेड टाइम्स वृत्तसेवा : पाटोदा तालुका पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची आज घोषणा करण्यात आली. यामध्ये तालुका कार्याध्यक्षपदी आमीर शेख यांची तर सचिवपदी महेश बेदरे यांची निवड करण्यात आली.
पाटोदा येथील शासकीय विश्रामगृहात आज पत्रकार संघाची बैठक पार पडली. जेष्ठ पत्रकार विजय जोशी यांच्या अध्यक्षतेखाली व पाटोदा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सोमीनाथ कोल्हे यांच्या उपस्थितीत पाटोदा तालुका पत्रकार संघाची तालुका कार्यकारणी एकमताने निवडण्यात आली.
यामध्ये पाटोदा तालुका पत्रकार संघाच्या कार्याध्यक्षपदी शेख अमीर, पाटोदा तालुका पत्रकार संघाच्या स्वागताध्यक्षपदी पोपट कोल्हे,पाटोदा तालुका पत्रकार संघाच्या हल्ला विरोधी कृती समितीच्या अध्यक्षपदी शेख अजिज, पाटोदा तालुका पत्रकार संघाच्या सचिवपदी महेश बेदरे, पाटोदा तालुका पत्रकार संघाच्या सरचिटणीसपदी किरण शिंदे पाटील,
पाटोदा तालुका पत्रकार संघाच्या ग्रामीण अध्यक्षपदी चंद्रकांत पवार,पाटोदा तालुका पत्रकार संघाच्या प्रवक्तेपदी गणेश शेवाळे, पाटोदा तालुका पत्रकार संघाच्या साप्ताहिक संघटनेच्या अध्यक्षपदी सचिन शिंदे, पाटोदा तालुका पत्रकार संघाच्या प्रेस फोटो ग्राफी अध्यक्षपदी सखाराम भोसले,पाटोदा तालुका पत्रकार संघाच्या सोशल मिडिया अध्यक्षपदी शेख महेशर,पाटोदा तालुका पत्रकार संघाच्या डीजिटल मिडीया अध्यक्षपदी दत्ता वाघमारे यांची निवड करण्यात आली.
तसेेच पाटोदा तालुका पत्रकार संघाच्या पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या कार्याध्यक्षपदी यशवंत सानप,पाटोदा तालुका पत्रकार संघाच्या वितरण समितीच्या अध्यक्षपदी बाबुराव पवळ, पाटोदा तालुका पत्रकार संघाच्या इलेक्ट्रीक मिडीयाच्या अध्यक्षपदी विशाल पोकळे,पाटोदा तालुका पत्रकार संघाच्या साप्ताहिक संघटनेच्या कार्याध्यक्षपदी बाजीराव जाधव,पाटोदा तालुका पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी सुधीर एकबोटे, पाटोदा तालुका पत्रकार संघाच्या उपाध्यक्ष पदी विजय जाधव,पाटोदा तालुका पत्रकार संघाच्या कोषाध्यक्षपदी प्रशांत कोळपकर, पाटोदा तालुका पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी भाऊसाहेब पवार, पाटोदा तालुका पत्रकार संघाच्या सोशल मीडियाच्या कार्याध्यक्षपदीपदी अविराज पवार
पाटोदा तालुका पत्रकार संघाच्या संघटकपदी बबनराव उकांडे, पाटोदा तालुका पत्रकार संघाच्या संघटकपदी अमोल येवले तर पाटोदा तालुका पत्रकार संघाच्या सल्लागारपदी विलास भोसले, अरुण कुलकर्णी, पोपट राऊत, विजय जोशी, बळीराम जायभाय यांची सर्वानुमते एकमताने निवड करण्यात आली.त्याबद्दल सर्व नुतन पदाधिकारी यांचे शाल,फेटा व हार घालून स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक अध्यक्ष सोमीनाथ कोल्हे यांनी केले,कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्ता वाघमारे यांनी केले तर आभार पोपट कोल्हे यांनी मानले.