Karjat Jamkhed News : कर्जत जामखेडमध्ये माजी सभापती आशाताई शिंदे यांचा झंझावाती दौरा : कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य, नागरिकांमध्ये नवा उत्साह

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । ७ ऑगस्ट २०२४ । सत्तार शेख । कर्जत-जामखेड मतदारसंघात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत.एकिकडे आमदार प्रा राम शिंदे यांची जनसंवाद पदयात्रा सुरु आहे तर दुसरीकडे आमदार शिंदे यांच्या सौभाग्यवती आशाताई शिंदे यांचा मतदारसंघात झंझावाती दौरा सुरु आहे.या झंझावाती दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये नवा उत्साह संचारला आहे.विधानसभा निवडणुकीचे मैदान मारण्यासाठी शिंदे दाम्पत्याने जोरदार कंबर कसल्याचे यातून दिसून येत आहे. (Karjat Jamkhed News)

Ex-Speaker Ashatai Shinde's hectic tour in Karjat Jamkhed, Vitality among activists, new enthusiasm among citizens, karjat jamkhed news today,

जामखेड पंचायत समितीच्या माजी सभापती आशाताई राम शिंदे हे गेल्या तीन महिन्यांपासून मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधत आहेत. कोणताही गाजावाजा न करता त्यांचा दौरा सुरु आहे.सध्या त्यांचा कर्जत शहरात दौरा सुरु आहे. गेल्या महिनाभरापासून कर्जत शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन जनतेशी त्या संवाद साधत आहेत. (Jamkhed news today)

नागरिकांच्या अडी अडचणी समजून घेत आहेत. काही प्रश्नांची सोडवणूक जागेवरच करत आहेत. त्यांच्या या दौर्‍यास सर्वसामान्य जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. भूमिपुत्रच आमदार का असावा ? याचे महत्व त्या जनतेला पटवून देत आहेत. त्या ज्या पध्दतीने मांडणी करत आहेत ती जनतेला खूपच भावत आहे. जनतेच्या मनात घर करत आहे. (Jamkhed latest news today)

Ex-Speaker Ashatai Shinde's hectic tour in Karjat Jamkhed, Vitality among activists, new enthusiasm among citizens, karjat jamkhed news today,

माजी सभापती आशाताई शिंदे ह्या समाजातील सर्व घटकातील नागरिकांशी आपुलकीने संवाद साधत आहेत. आमदार मंत्री असताना आमदार प्रा राम शिंदे यांनी मतदारसंघात केलेली विकास कामे त्याचबरोबर मोदी सरकार व महायुती सरकार राबवत असलेल्या योजनांची त्या जनतेला माहिती देत आहेत. (Karjat latest news)

जनतेच्या अडी अडचणी समजून घेत आहेत.आजारी रुग्णांच्या भेटी, सांत्वन भेटी, लग्नसमारंभाला भेटी देत आहेत. जनतेत मिसळून त्यांच्या सुख दु:खात त्या सहभागी होताना दिसत आहेत.साधेपणा जपत त्या सर्वांशी आपुलकीने संवाद साधत आहेत, त्यामुळे त्यांच्या दौर्‍याला जनतेतून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. (Karjat jamkhed live news)

Ex-Speaker Ashatai Shinde's hectic tour in Karjat Jamkhed, Vitality among activists, new enthusiasm among citizens, karjat jamkhed news today,

त्यांचा हा दौरा केवळ निवडणूक प्रचार नाही, तर स्थानिक विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा आहे. स्थानिक लोकांना एकत्र आणणे आणि त्यांच्या समस्यांवर जाणून घेणे आणि त्यावर काम करणे हा त्यामागचा उद्देश आहे. “आपल्याला एक नेता लागतो जो जनतेच्या समस्या समजून घेईल,” ह्या पध्दतीने शिंदे यांचा जनतेशी संवाद सुरू आहे. त्यांच्या या दौर्‍यामुळे सर्वसामान्यांच्या मनात त्यांनी विश्वास निर्माण केला आहे. तर दुसरीकडे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश भरला आहे. (Karjat live today)

Ex-Speaker Ashatai Shinde's hectic tour in Karjat Jamkhed, Vitality among activists, new enthusiasm among citizens, karjat jamkhed news today,

लाडकी बहिण योजनेवर महिला वर्ग खुश

महायुती सरकारने हाती घेतलेल्या लाडकी बहिण योजनेबाबत महिलांना काही अडी अडचणी येत आहेत का ? याची माहिती घेतली जात आहे, काही अडचण असेल तर त्या सोडविण्यावर आम्ही भर देत आहोत.लाडकी बहिण योजना समितीचे अध्यक्ष आमदार प्रा राम शिंदे यांच्या माध्यमांतून मतदारसंघातील 1 लाख 4 हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. यामुळे आमदार प्रा राम शिंदे साहेब व महायुती सरकारवर महिला वर्ग खुश आहे, कर्जत -जामखेड मतदारसंघात दौरा करत असताना प्रत्येक गावातील महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. सर्व लाडक्या बहिणी सरकारवर खुश आहेत, अशी प्रतिक्रिया माजी सभापती आशाताई शिंदे यांनी दिली.

Ex-Speaker Ashatai Shinde's hectic tour in Karjat Jamkhed, Vitality among activists, new enthusiasm among citizens, karjat jamkhed news today,

महिला पदाधिकाऱ्यांची खंबीर साथ

माजी सभापती आशाताई शिंदे यांनी गेल्या तीन महिन्यांपासून मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्यांच्या या दौर्‍यात त्यांना मतदारसंघातील महिला पदाधिकाऱ्यांची खंबीर साथ मिळत आहे. महायुतीच्या सर्व महिला पदाधिकारी मोठ्या उत्साहात या दौर्‍यात सहभागी होऊन आशाताई शिंदे यांचा जनतेशी संवाद घडवून आणत आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी महिला पदाधिकारी मोठी मेहनत घेत असल्याचे दिसून येत आहे.

Ex-Speaker Ashatai Shinde's hectic tour in Karjat Jamkhed, Vitality among activists, new enthusiasm among citizens, karjat jamkhed news today,

गावागावात एकच नारा.. चला भूमिपुत्राला साथ देऊया

कर्जत-जामखेड मतदारसंघात यंदा आपला भूमिपुत्रच आमदार करायचाय या भूमिकेतून गावागावातील जनता एकवटली आहे.रोहित पवारांच्या मनमानी व एकाधिकारशाही कारभाराविरोधात अनेक नेत्यांनी बंड पुकारत साथ सोडलीय. जनसंवाद पदयात्रेमुळे आमदार राम शिंदे यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झालीय.चला भूमिपुत्राला साथ देऊया असे म्हणत गावागावातून शिंदे यांना मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळत आहे. मतदारसंघात सध्या भूमिपुत्राचीच हवा आहे.

Ex-Speaker Ashatai Shinde's hectic tour in Karjat Jamkhed, Vitality among activists, new enthusiasm among citizens, karjat jamkhed news today,