खळबळजनक : जामखेड तालुक्यात शुक्रवारी झाला कोरोनाचा विस्फोट ! (Exciting: Corona explodes in Jamkhed taluka on Friday)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात कोरोनाचा उद्रेक वाढू लागलाय. शुक्रवारी कोरोनाने सर्वात मोठा दणका दिला आहे. जामखेड तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट सक्रीय झाली असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे अशीच स्थिती निर्माण झाली आहे.जामखेड तालुक्यात  शुक्रवारी दिवसभरात तब्बल 25 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. (Exciting: Corona explodes in Jamkhed taluka on Friday)

जामखेड तालुक्यातील दिघोळमध्ये आज दिवसभरात 49 रॅपीड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या. यात 12 जण कोरोनाबाधित निघाले आहेत. तर पाडळी गावात 51 रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या त्यात 03 जण तर जामखेडमध्ये करण्यात आलेल्या 11 रॅपिड अँटीजेन चाचण्यात 01 जण कोरोनाबाधित निघाला आहे. याशिवाय जिल्हा रूग्णालयाच्या अहवालात 09 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यामध्ये दिघोळ मधील 06 जणांचा तर जामखेड शहरातील 03 जणांचा समावेश आहे. संपुर्ण दिवसभरात प्रशासनाने 111 नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या त्यात 16 जण कोरोनाबाधित तर जिल्हा रूग्णालयाच्या अहवालात 09 असे एकुण 25 जण कोरोनाबाधित आढळून आल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली. जामखेडच्या आरोळे हाॅस्पीटलमध्ये सध्या 61 रूग्णांवर उपचार केले जात आहेत. (Exciting: Corona explodes in Jamkhed taluka on Friday)

शनिवारी जामखेडचा आठवडे बाजार सुरू राहणार – तहसिलदार विशाल नाईकवाडे

कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव दिघोळ गावात झाला आहे.  दिघोळ गाव आता कोरोनाचे नवे हाॅटस्पाॅट केंद्र म्हणून समोर आले आहे. प्रशासनाने दिघोळ गाव कंटनमेंट झोन म्हणून घोषित केले आहे. दरम्यान जामखेड शहराचा आठवडे बाजार शनिवारी सुरू राहणार की बंद याबाबत दिवसभर अफवा सुरू होत्या. परंतु उद्याचा बाजार भरणार आहे. कुणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे अवाहन जामखेडचे तहसिलदार विशाल नाईकवाडे यांनी केले आहे. (Exciting: Corona explodes in Jamkhed taluka on Friday)