जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्यसभा निवडणूकी संदर्भात एक मोठी बातमी राज्याच्या राजकीय वर्तुळातून आज समोर आली. छत्रपती संभाजी महाराज यांनी पत्रकार परिषद घेत राज्यसभा निवडणूक न लढवण्याची मोठी घोषणा केली आहे. (Finally Chhatrapati Sambhaji Maharaj’s big announcement, Chhatrapati Sambhaji Maharaj announced not to contest Rajya Sabha elections)
छत्रपती संभाजी महाराजांनी राज्यसभेची अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय यापूर्वी जाहीर केला होता, मात्र त्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या; शिवसेनेने संभाजीराजेंना राज्यसभेची उमेदवारी देऊ केली होती,मात्र राजेंनी उमेदवारी घेण्यास नकार दिला.राजे अपक्ष उमेदवारीवर ठाम होते. त्यानंतर शिवसेनेने कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली होती.
छत्रपती संभाजी राजे राज्यसभेची निवडणूक लढवणार की नाही ? याबाबत गेल्या दोन दिवसांपासून अनेक चर्चा राज्यात रंगल्या होत्या, आज यासर्व चर्चांना छत्रपती संभाजीराजेंनी पूर्णविराम दिला, राज्यसभेची निवडणूक न लढवण्याची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
माझ्यासाठी खासदारकी महत्वाची नाही. माझ्यासाठी जनता महत्वाची आहे. मी राज्यसभा निवडणुकीला सामोरं जाणार नाही, पण ही माझी माघार नसून, स्वाभिमान असल्याचे संभाजीराजे म्हणाले.