Five children drowned during Ganpati immersion | गणपती विसर्जनाला गालबोट : 05 मुले बुडाली, दोघांना वाचवण्यात यश, तिघे बेपत्ता 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । मुंबई | मुंबईसह संपूर्ण राज्यभरात अकरा दिवसांच्या गणरायाला भक्तीभावाने निरोप देण्यात आला. सगळीकडे भक्तिमय वातावरण असताना राज्यात काही ठिकाणी या विसर्जनाला गालबोट लागले. राज्यातील काही भागात पाण्यात बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडल्याचे समोर आले आहे.(Five children drowned during Ganpati immersion)

मुंबईच्या वर्सोवा समुद्रकिनारी रविवारी रात्रीच्या सुमारास 5 मुले बुडाली. त्यातील दोन मुलांना वाचविण्यात स्थानिक नागरिकांना यश आले असून, त्यांच्यावर कपुर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित तीन मुले अजूनही बेपत्ता आहेत.

स्थानिक पोलीस, पालिका, अग्निशामक दल आणि तटरक्षक दलाच्या माध्यमातून या बेपत्ता मुलांचा शोध घेतला जात आहे. तसेच नौदलाचीही मदत घेण्यात येत आहे. रात्री अधूनमधून पावसाचा जोर वाढत असल्यामुळे मुलांचा शोध घेण्यात अडथळा येत होता.(Five children drowned during Ganpati immersion)

पालिका सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणपती विसर्जनादरम्यान अंधेरीच्या वर्सोवा गाव समुद्र किनाऱ्यावर रविवार रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली. विसर्जन करत असताना 5 मुले खोल समुद्राच्या दिशेने गेली. त्या मुलांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने पाचही मुले पाण्यामध्ये बुडाली.(Five children drowned during Ganpati immersion)

ही घटना निदर्शनास येताच तेथील स्थानिक रहिवाश्यांनी तात्काळ धाव घेऊन मुलांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु केले.यावेळी दोघांना वाचवण्यात आले, मात्र 3 मुलांचा अजून थांगपत्ता लागलेला नाही. बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने गणपती विसर्जनादरम्यान तैनात केलेल्या जीवरक्षक तसेच अग्निशमन दलाच्या साहाय्याने बेपत्ता मुलांचा शोध घेतला जात आहे.(Five children drowned during Ganpati immersion)

पुण्याच्या इंद्रायणी नदीत दोन मुले बुडाली

पुणे जिल्ह्यातही गणपती विसर्जनादरम्यान दोन मुले बुडाली. मोशी आळंदी रोडवर इंद्रायणी नदी पात्रात गणपतींचे विसर्जन सुरू असताना दोन मुले बुडाल्याची घटना घडली. दत्ता ठोंबरे (20) आणि प्रज्वल काळे (18) अशी या मुलांची नाव आहे. प्रज्वल काळे हा ठोंबरे यांचा नातेवाईक होता. गणपतीनिमित्त तो पुण्यात आला होता.(Two children drowned in Indrayani river in Pune)

घटनेची खबर मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. बुडालेल्या मुलांपैकी एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्या मुलाचा शोध घेतला जात आहे. (Two children drowned in Indrayani river in Pune)

अमरावतीत एकाचा मृत्यू

तसेच अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील 17 वर्षीय अरमान पठाण या मुलाचा बासलापूर तलावात बुडून मृत्यू झाला. पोहताना गाळात पाय फसल्याने तो बुडाला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात काका आणि इतर दोन भाऊही गाळात फसले होते. पण, गणपती विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांनी त्यांचे प्राण वाचवले. मात्र अरमानच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे. (One dies after drowning in lake in Amravati)

 

web title: Five children drowned during Ganpati immersion