Ram Shinde News : आमदार राम शिंदे यांच्या पाठपुराव्यातून उर्वरित पिकविम्याचे १२४ कोटी रुपये मंजूर, कर्जत व जामखेड तालुक्यातील शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत खरीप हंगाम २०२३ मधील ऊर्वरीत पीक विमा मंजुर व्हावा याकरिता आमदार प्रा राम शिंदे यांनी सरकार दरबारी पाठपुरावा हाती घेतला होता. शिंदे यांनी हाती घेतलेल्या जोरदार पाठपुराव्यामुळे कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यांसाठी एकुण १२४ कोटी ४० लाख इतका पीक विमा मंजुर झाला आहे. मंजुर पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे मतदारसंघातील शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांच्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आमदार प्रा राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे मागील वर्षीच्या खरीप पिक विम्यापोटी मतदारसंघासाठी १७६ कोटी २१ लाख रूपयांचा पीक विमा मंजुर झाला होता. त्यामध्ये कर्जत तालुक्यासाठी ९४ कोटी ६२ लाख तर जामखेड तालुक्यातील ८१ कोटी ५९ लाख रूपये मंजुर झाला होता. यामध्ये कर्जत तालुक्यात ३० कोटी आणि जामखेडमध्ये २२ कोटी असे एकुण ५२ कोटी रूपयांच्या पीक विम्याचे वितरण करण्यात आले होते.
खरिप हंगाम २०२३ मधील ऊर्वरित पीक विमा मिळावा याकरिता आमदार प्रा.राम शिंदे यांनी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा सुरु ठेवला होता. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे, महसुल व पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे या प्रश्नाकडे वेळोवेळी लक्ष वेधले होते.
आमदार शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे सरकारने २०२३ च्या खरिप हंगामतील उर्वरित पीक विम्याची १२४.४ कोटी रुपये मंजूर केले आहेत. यामध्ये कर्जत तालुक्यासाठी ६४.४० कोटी तर जामखेड तालुक्यासाठी ६० कोटी रुपये मंजूर केले आहेत. मंजुर पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.यामुळे दोन्ही तालुक्यातील शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
खरीप हंगाम २०२३ मधील ऊर्वरीत पीक विमा मिळावा याकरिता सरकारकडे पाठपुरावा सुरु होता. कर्जत-जामखेड मतदारसंघातील अनेक शेतकरी बांधव या विम्यापासून वंचित राहिले होते. त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी माझा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्याची दखल घेऊन सरकारने १२४.४ कोटी रुपयांचा ऊर्वरित पीकविमा मंजुर केला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा दिला आहे. मतदारसंघातील जनतेच्या वतीने सरकारचे मनापासून आभार !