जामखेड टाईम्स वृत्तसेवा : कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. राजकीय नेतेही कोरोना बाधित होऊ लागले आहेत. अश्यातच माजी मंत्री प्रा राम शिंदे हेही कोरोना बाधित झाले आहेत. राम शिंदे यांनी यासंबंधीची माहिती स्वता: सोशल मिडीयावर पोस्ट टाकत दिली आहे. (Former Minister Ram Shinde Corona Positive)
जामखेड तालुक्यातील गुरूवार अखेर 23 सक्रीय कोरोनाबाधितांची संख्या होती. जामखेड तालुक्यात कोरोना हळूहळू पुन्हा सक्रीय होऊ लागला आहे. नागरिकांनी योग्य ती दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. सध्या प्रशासन कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजना कठोरपणे राबताना दिसत नाही. (Former Minister Ram Shinde Corona Positive)