AB PM-JAY for senior citizens : देशातील 70 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना मोफत आरोग्य विमा योजना लागू, आयुष्मान भारत योजनेचा अर्ज कसा करायचा ? जाणून घ्या सविस्तर!

AB PM-JAY for senior citizens : देशातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी राबवण्यात येत असलेल्या ‘आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना’ (Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana AB PM-JAY) या योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. ७० वर्षांवरील जेष्ठ नागरिकांचा या योजनेत समावेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेत (Ayushman Bharat health insurance scheme for senior citizens by government) ७० वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना समावेश करण्यात आला आहे.

free health insurance scheme for senior citizens above 70 years, AB PM-JAY for senior citizens, How to apply for Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana AB PM-JAY? marathi mahiti,

या योजनेसाठी असलेली उत्पन्नाची मर्यादा जेष्ठ नागरिकांना नसेल. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे देशातील ६ कोटी जेष्ठ नागरिक व ४.५ कोटी कुटुंबांना याचा थेट फायदा होणार आहे. या योजनेच्या विस्तारासाठी सरकारला ३४३७ कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. केंद्र सरकार ६० टक्के तर राज्य सरकार ४० टक्के वाटा उचलणार आहे. दुर्गम भागातील ९० टक्के वाटा केंद्र सरकारचा असणार आहे. (pm health insurance scheme for senior citizens)

आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेत समाविष्ट कुटूंबाला ५ लाखांचा कौटुंबिक आरोग्य विमा मिळतो. ही योजना देशातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी राबवली जात होती. आता यात जेष्ठ नागरिकांचाही समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जर एका कुटुंबात एकापेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक असतील तर विम्याची रक्कम त्यांच्यामध्ये विभागली जाईल. ज्या ज्येष्ठ नागरिकांना इतर कुठल्याही सरकारी विमा योजनेचा लाभ मिळत असेल तर त्यांना आयुष्मान भारत कार्ड घेताना एक विमा योजना निवडावी लागेल. (AB PM-JAY for senior citizens)

देशातील ७० वर्षाचे सर्व नागरिक आता आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेसाठी पात्र असतील. ज्यांना सीजीएचएस, एसजीएचएस किंवा आयुष्मान योजनेच्या सीएपीएफ या योजनेअंतर्गत विमा लाभ मिळत असेल त्यांनी यातून एका पर्यायची निवड करायची आहे. म्हणजेच आयुष्माम भारत योजनेचा लाभ घेतला तर त्यांना इतर लाभ सोडावे लागतील. पण, त्याचवेळी खाजगी विमा घेतला असेल तर आयुष्मान योजनेचा लाभ त्यांना मिळू शकेल. आयुष्मान योजनेचे पूर्वीचे लाभार्थी असाल तर आता तुम्हाला अतिरिक्त ५ लाखांचा आरोग्य विमा मिळू शकेल. (AB PM-JAY for senior citizens)

प्रत्येक कुटुंबातील ७० वर्षांवरील व्यक्तीला आता आयुष्मान योजनेचा Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana AB PM-JAY लाभ मिळणार आहे. या योजनेंतर्गत उपचारासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (दि.11) या योजनेला मंजुरी दिली. या योजनेसाठी अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात..! (AB PM-JAY for senior citizens)

आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना काय आहे?

जगातील सर्वात मोठी सार्वजनिक अर्थसहाय्यित आरोग्य विमा योजना मानली जाणारी आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (AB PM-JAY) ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीकडे दुर्लक्ष करून सर्वसमावेशक आरोग्य सेवा प्रदान करेल. पात्र ज्येष्ठ नागरिकांना AB PM-JAY अंतर्गत नवीन वेगळे कार्ड दिले जाईल, ज्यामुळे त्यांना योजनेचा लाभ घेता येईल. (Ayushman Bharat Health Insurance Scheme For Senior Citizens )

योजनेची ‘उद्दिष्टे’

आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (AB PM-JAY) ही भारत सरकारने 2018 मध्ये सुरू केलेली एक प्रमुख आरोग्य विमा योजना, ज्याचा उद्देश समाजातील सर्वात असुरक्षित घटकांना परवडणारी आरोग्य सेवा प्रदान करणे आहे. ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आहे, ज्याचे लक्ष्य 12 कोटी गरीब आणि असुरक्षित कुटुंबांना आहे. या योजनेचे सुमारे 55 कोटी लाभार्थी समाविष्ट आहेत, जे भारतीय लोकसंख्येच्या सुमारे 40 टक्के आहेत. (AB PM-JAY for senior citizens)

आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना : पात्रता निकष (AB PM-JAY for senior citizens)

आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना: पात्रता निकष हे ग्रामीण आणि शहरी पुढीलप्रमाणे आहेत.

ग्रामीण

  • अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कुटुंबांसह आर्थिक दुर्बल घटक
  • 16 ते 59 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती ज्यांना कुटूंब नाही
  • ज्या कुटुंबांमध्ये किमान एक शारीरिकदृष्ट्या विकलांग सदस्य आहे आणि सक्षम शारीरिक प्रौढ सदस्य नाही
  • अंगमेहनतीचे काम करून उदरनिर्वाह करणारी भूमीहीन कुटुंबे
  • आदिम आदिवासी जमाती
  • वेठबिगारी करणारी कुटूंबे
  • व्यवस्थित भिंती किंवा छप्पर नसलेल्या एका खोलीच्या तात्पुरत्या घरात राहणारी कुटुंबे
  • मैला साफ करणारे सफाई कामगार
  • भिकारी आणि भिकेवर जगणाऱ्या व्यक्ती

शहरी

  • सामाजिक-आर्थिक जात जनगणना २०११ मध्ये उपस्थित व्यावसायिक श्रेणीतील शहरी कामगारांची कुटुंबे
  • राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना (RSBY) अंतर्गत नोंदणीकृत कुटुंबे (AB PM-JAY for senior citizens)

पात्रता ऑनलाइन कशी तपासायची?

  • प्रथम Ayushman Bharat Yojna च्‍या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • “मी पात्र आहे का” विभागात प्रवेश करा
  • मोबाइल नंबर आणि कॅप्चा कोड भरा. नंतर ओटीपी वर क्लिक करा
  • ओटीपी भरा
  • त्यानंतर ओटीपी सत्यापित करा
  • आवश्यक माहिती द्या आणि “सबमिट करा” यावर क्लिक करा

अर्ज कसा करावा? ab pmjay for senior citizens how to apply ?

आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेसाठी अर्ज पुढीलप्रमाणे भरा

  • प्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • वेबसाइटवर गेल्यानंतर तुमचे आधार कार्ड किंवा रेशन कार्ड PMJAY पडताून बघा
  • कौटुंबिक ओळखीचे पुरावे सादर करा
  • युनिक AB-PMJAY ID सह तुमचे ई-कार्ड प्रिंट करा

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे फायदे

  • हॉस्पिटलायझेशन, उपचार, निदान, औषधे, शस्त्रक्रिया आणि उपचारानंतरची काळजी यासारख्या खर्चाचा समावेश करून लाभार्थींना वार्षिक 5 लाखांच्या आरोग्य विमा आहे.
  • प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सार्वजनिक आणि खाजगी रुग्णालयांमध्ये कॅशलेस सेवा आहे, ज्यामुळे लाभार्थ्यांचा खिशातून होणारा खर्च कमी होतो. (AB PM-JAY for senior citizens)
  • लाभार्थींच्या कुटुंबातील सदस्य संख्या, वय किंवा लिंग यावर कोणतीही मर्यादा नाही
  • एखाद्या कुटूंबात ७० वर्षांवरील दोन ज्येष्ठ नागरिक असल्यास दोघांमध्ये विभागून ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य कवच मिळणार आहे
  • गरीब, मध्यम अथवा श्रीमंत कुटूंब असो, सर्व कुटूंबातील ज्येष्ठांना या योजनेचा लाभ होणार आहे
  • या योजनेमध्ये रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचे 3 दिवस आणि रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 15 दिवसांचा खर्च, निदान आणि औषधांचा समावेश आहे
  • लाभार्थी कोणत्याही पॅनेल केलेल्या रुग्णालयात संपूर्ण भारतातील सेवांचा लाभ घेऊ शकतात.
  • नावनोंदणीच्या पहिल्या दिवसापासून, या योजनेंतर्गत आधीपासून अस्तित्वात असलेले सर्व आजार समाविष्ट केले जातात
  • ही योजना गंभीर आजारांमुळे आणि रुग्णालयात दाखल झाल्यामुळे होणारा आर्थिक भार कमी करण्यास मदत करते
  • या योजनेत डॉक्टरांची फी, रूम भाडे, डायग्नोस्टिक्स, आयसीयुमध्ये असल्यास त्याची काळजी आणि वैद्यकीय प्रत्यारोपणाच्या खर्चासह जवळपास 1,929 प्रक्रियांचा समावेश आहे. (AB PM-JAY for senior citizens)

आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेमधील लाभ? या योजनेत खालीलप्रमाणे सर्व खर्च समाविष्ट आहेत,

  • वैद्यकीय तपासणी, उपचार आणि सल्ला
  • रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीची काळजी (रुग्णालयात प्रवेश करण्यापूर्वी तीन दिवसांपर्यंत)
  • औषधे आणि वैद्यकीय उपभोग्य वस्तू
  • नॉन-इंटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह केअर सेवा (ICU काळजी)
  • निदान आणि प्रयोगशाळा तपासणी
  • आवश्यक असल्यास वैद्यकीय रोपण
  • रुग्णालयात दाखल झाल्यानंतर दरम्यान निवास आणि अन्न सेवा
  • उपचारादरम्यान उद्भवणारी गुंतागुंत
  • डिस्चार्ज मिळ्यानंतर १५ दिवसांपर्यंत वैद्यकीय काळजी

सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअरवरुन आयुष्मान ॲप डाउनलोड करा.यानंतर मोबाईल नंबर टाकून लॉग इन करा. लॉगिन केल्यानंतर, त्यात तुमची पात्रता तपासा.सरकारच्या नव्या निर्णयानुसार, 70 वर्षे किंवा त्याहून अधिक वय वर्ष असणाऱ्या कोणत्याही उत्पन्न गटातील लोक यासाठी पात्र आहेत.त्यानंतर तुम्हाला तुमचे आधार ई-केवायसी करावे लागेल. आता फोटो अपलोड करावा लागेल, त्यानंतरच तुम्ही तुमचे कार्ड डाउनलोड करु शकता. (AB PM-JAY for senior citizens)

दरम्यान, मोदी सरकारने 2017 मध्ये आयुष्मान भारत योजना सुरु केली होती. आयुष्मान भारत ही जगातील सर्वात मोठी विमा योजना आहे, जी सध्या देशातील सर्वात गरीब 40 टक्के लोकांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार प्रदान करते. आता मोदी सरकारने या योजनेत आणखी बदल करत 70 वर्षे किंवा त्याहून अधिक वय वर्ष असणाऱ्या व्यक्तींनाही आयुष्यमान योजनेचा लाभ घेण्यास परवानगी दिली आहे. (AB PM-JAY for senior citizens)

सरकारने सांगितल्यानुसार, आयुष्मान भारत (Ayushman Bharat Card) प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत (AB PM-JAY) ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या वृद्धांचा समावेश केला जाईल. यामुळे जवळपास 4.5 कोटी कुटुंबांना फायदा होईल आणि ६ कोटी वृद्ध नागरिकांना ५ लाखांपर्यंत फ्री उपचार मिळेल. यातील पात्र ज्येष्ठ नागरिकांना AB PM-JAY अंतर्गत नवीन स्वतंत्र कार्ड दिले जाईल. (AB PM-JAY for senior citizens) जी कुटुंबे आधीच आयुष्मान भारत योजनेचा भाग आहेत, त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती ७० वर्षांपेक्षा जास्त वयाची असल्यास, त्यांना वर्षाला ५ लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त टॉप-अप मिळेल. जी कुटुंबे सध्या आयुष्मान भारत योजनेत नाहीत. ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा त्यात समावेश केला जाईल आणि त्यांना दरवर्षी ५ लाख रुपयांचे शेयर्ड कव्हर मिळेल. (Ayushman Bharat Health Insurance Scheme For Senior Citizens )