frist time mla in maharashtra 2024 list : महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४मध्ये पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांची यादी
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnvis cm) तर शिवसेनाप्रमुख एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून काम करणार आहेत. राज्य सरकारच्या शपथविधीनंतर शनिवारपासून विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला सुरूवात झाली. २८८ आमदारांचे संख्याबळ असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत यंदा ७८ आमदार पहिल्यांदाच निवडून आले आहेत. पहिल्यांदा निवडून आलेल्या या आमदारांमध्ये २५ ते ३५ वयोगटातील १० आमदारांचा समावेश आहे. पहिल्यांदा निवडून आलेले कोण आहेत ते आमदार ? जाणून घेऊयात सविस्तर
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महायुतीने महाविकास आघाडीचा सुफडासाफ करत एकहाती सत्ता हस्तगत केली. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ७८ उमेदवारांनी पहिल्यांदा विजयी गुलाल उधळत विधानसभेत प्रवेश केला. स्वर्गीय आर आर आबा यांचे चिरंजीव रोहित पाटील (Rohit R R Patil) हे सर्वात सर्वात कमी वयात निवडून आलेले एकमेव आमदार ठरले आहेत. १५ व्या विधानसभेत २५ ते ४५ वयोगटातील ५७ तर २५ ते ३५ वयोगटातील १० आमदार निवडून आले आहेत.
पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांमध्ये भाजपच्या सर्वाधिक २९ आमदारांचा समावेश आहे. रोहित पाटील, वरूण सरदेसाई, महेश सावंत, मनोज जामसुतकर, अनंत नर, हारून खान, संजय उपाध्याय, मुरजी पटेल, सना नवाब मलिक, ज्योती गायकवाड, श्रीजया अशोक चव्हाण, विक्रमसिंह बबनराव पाचपुते, अतुल भोसले, सुमित वानखेडे, सुहास बाबर, विलास संदिपान भूमरे, अमोल चिमणराव पाटील, हे सर्वजण पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आहेत.
भाजपचे पहिल्यांदा निवडून आलेले आमदार (First Time BJP MLA in Maharashtra Vidhan Sabha 2024)
- शंकर जगताप – चिंचवड
- राजन नाईक – नालासोपारा
- राघवेंद्र पाटील – धुळे ग्रामीण
- संजय उपाध्याय – बोरिवली
- अतुल बाबा भोसले – कराड दक्षिण
- अनुराधा चव्हाण – फुलंब्री
- मनोज घोरपडे – कराड उत्तर
- श्रीजया चव्हाण – भोकर
- राहुल आवाडे – इचलकरंजी
- श्याम खोडे – वाशिम
- मिलिंद नरोटे – गडचिरोली
- अनुप अग्रवाल – धुळे शहर
- हरीशचंद्र भोये – विक्रमगड
- अमोल जावळे – रावेर
- देवेंद्र कोथे- सोलापूर शहर मध्य
- किसन वानखडे – उमरखेड
- चरणसिंह बाबुलालजी ठाकूर – काटोल
- सुमित वानखेडे – आर्वी
- विक्रम पाचपुते – श्रीगोंदा
- उमेश यावलकर – मोर्शी
- राजेश वानखेडे – तिवसा
- राजेश बकाने – देवळी
- हेमंत रासने – कसबा पेठ
- सई डहाके – कारंजा
- सुलभा गायकवाड- कल्याण पूर्व
- प्रवीण तायडे – अचलपूर
- स्नेहा दुबे पंडीत – वसई
- देवराव विठोबा भोंगळे – राजुरा
- करण देवतळे – वरोरा
शिवसेना ठाकरे गट (First Time Shivsena Thackeray FactionMLA in Maharashtra Vidhan Sabha 2024)
- वरुण सरदेसाई – वांद्रे पूर्व
- महेश सावंत -माहीम
- मनोज जामसूतकर -भायखळा
- हारून खान – वर्सोवा
- अनंत बाळा नर – जोगेश्वरी
- सिद्धार्थ खरात -मेहेकर
- गजानन लवटे -दर्यापूर
- संजय देरकर -वणी
- प्रवीण स्वामी -उमरगा
- बालाजी काळे -खेड
शरद पवार राष्ट्रवादी (First Time Sharad Pawar ncp MLA in Maharashtra Vidhan Sabha 2024
- उत्तमराव जानकर- माळशिरस
- रोहित पाटील- तासगाव कवठे महांकाळ
- बापूसाहेब पठारे- वडगाव शेरी
- अभिजित पाटील- माढा
- राजू खरे- मोहोळ
अजित पवार राष्ट्रवादी (First Time Ajit Pawar ncp MLA in Maharashtra Vidhan Sabha 2024)
- सिंदखेडराजा- मनोज कायंदे
- अणुशक्तीनगर – सना मलिक
- शिरूर – माउली कटके
- भोर – शंकर मांडेकर
- पारनेर – काशिनाथ दाते
- गेवराई – विजयसिंह पंडित
- फलटण – सचिन पाटिल
- पाथरी- राजेश विटेकर
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा, पक्षीय बलाबल 2024 (Maharashtra Assembly party wise seats)
- महायुती- 237
- मविआ- 49
- अपक्ष/इतर – 02
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा (Maharashtra Partywise seat sharing 2024)
- भाजप- 132
- शिवसेना (शिंदे गट)- 57
- राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41
- काँग्रेस- 16
- राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
- शिवसेना (ठाकरे गट)- 20
- समाजवादी पार्टी- 2
- जन सुराज्य शक्ती- 2
- राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1
- राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1
- एमआयएम- 1 जागा
- सीपीआय (एम)- 1
- पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1
- राजर्षी शाहू विकास आघाडी- 1
- अपक्ष- 2
भाजपला पाठिंबा देणारे मित्रपक्ष आणि अपक्ष
- जनसुराज्य शक्ती – 2
- युवा स्वाभिमान -1
- रासप- 1
- अपक्ष – 1 (शिवाजी पाटील- चंदगड)
- भाजपचे एकूण संख्याबळ (BJP MLAs in Maharashtra) 132+5 = 137