GBS Disease In Pune : दुर्मिळ आजाराच्या विषाणूने उडवली पुणेकरांची झोप, गुइलेन बॅरे सिंड्रोम या आजाराच्या रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ, राज्यात खळबळ !
GBS Disease In Pune : पुणे शहर व जिल्ह्यात GBS या दुर्मिळ आजाराने डोके वर काढल्याने पुणेकरांची झोप उडवून दिली आहे. गुइलेन बॅरे सिंड्रोमने या दुर्मिळ आजाराने पुण्यात थैमान घालण्यास सुरुवात केली आहे.जीबीएस या दुर्मिळ आजाराच्या (Gulen Bury Syndrome in Pune ) रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाल्याने आरोग्य विभाग व पुणे महापालिका अलर्टमोडवर आली आहे.संशयित रुग्णांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल काय येतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. (gulen bury syndrome in marathi)

गुलेन बॅरी सिंड्रोम हा दुर्मिळ (gbs virus in marathi) आजाराचा सर्वाधिक धोका १२ ते ३० वयोगटातील लोकांना आहे. पुण्यात या आजाराचे २२ रूग्ण आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. आता त्यात आणखीन वाढ झाली आहे. एकुण रुग्णांची संख्या आता २४ वर पोहचली आहे. यातील १० रूग्ण व्हेंटिलेटरवर गेले आहेत.यात लहान मुले व तरूणांचा समावेश आहे अशी माहिती डॉ समीर जोग यांनी दिली आहे. एकुणच या नव्या विषाणूमुळे पुणेकरांसह राज्यातील नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत. (GBS News Pune Today)
पुण्यात एकाच आठवड्यात जाबीएस आजाराचे २२ रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा अत्यंत दुर्मिळ आजार मानला जातो. या आजाराचे अचानक इतके रूग्ण वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात या आजाराच्या १६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये १० तरूण व ६ मुलांचा समावेश आहे. यातील १० रुग्णांवर व्हेंटिलेटर उपचार करण्यात येत आहेत, अशी माहिती डाॅ समीर जोग यांनी दिली. (GBS News Pune)
दुर्मिळ आजाराने बाधित रुग्णांची तपासणी केली जात आहे. तसेच ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते त्या परिसरातही रुग्णांची तपासणी केली जाणार अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी नीना बोराडे यांनी दिली आहे. तसेच या संशयित रूग्णांचे सॅम्पल्स एनआयव्हीकडे पाठवण्यात आले आहेत.या आजारासंदर्भात घाबरून जाण्याचा कारण नाही. हा संसर्गजन्य आजार नाही. या आजारासाठी वेगळी ट्रीटमेंट लागत नाही. नेहमीची जी ट्रीटमेंट असते तीच ट्रीटमेंट दिली जाते. त्यामुळे लवकरात लवकर बरा होणारा हा आजार असल्याचे नीना बोराडे यांनी सांगितले आहे. (GBS disease In Pune)
नेमका आजार काय?
गुइलेन बॅरे सिंड्रोम (GBS) हा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मज्जातंतूवर हल्ला करते. या स्थितीचा परिणाम स्नायुंमधील कमकुवतपणा, पक्षाघात आणि गंभीर प्रकरणांमध्ये जीवघेणी गुंतागुंत होऊ शकते. दुर्मिळ असा गुइलेन बॅरे सिंड्रोम हा कोणत्याही व्यक्तीला प्रभावित करू शकतो.
जीबीएस या आजाराचे पहिले लक्षण म्हणजे अशक्तपणा आणि हातपाय मुंग्या येणे. या आजाराचे कारण सध्या माहीत नाही. गुइलेन बॅरे सिंड्रोमची कारणे पूर्णपणे समजून घेणे वैद्यकीय शास्त्रासाठी अजूनही एक आव्हान आहे. पण गुइलेन बॅरे सिंड्रोमला ऑटोइम्यून डिसऑर्डर म्हणतात. गुइलेन बॅरे सिंड्रोम दोन तृतीयांश रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया किंवा लसीकरणानंतर सात दिवस ते पाच आठवड्यानंतर दिसून आले आहे. त्याचवेळी काही लोकांमध्ये हे संक्रमण ट्रिगरसारखे कार्य करते.
गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मज्जातंतूंवर हल्ला करते. या स्थितीचा परिणाम स्नायूंमधील कमकुवतपणा, पक्षाघात आणि गंभीर प्रकरणांमध्ये जीवघेणी गुंतागुंत होऊ शकते. दुर्मिळ असा गुइलेन बॅरे सिंड्रोम कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना प्रभावित करू शकते. गुइलेन बॅरे सिंड्रोमची कारणे पूर्णपणे समजून घेणे वैद्यकीय शास्त्रासाठी अजूनही एक आव्हान आहे. गुइलेन बॅरे सिंड्रोमला ऑटोइम्यून डिसऑर्डर म्हणतात. गुइलेन बॅरे सिंड्रोमचे (GBS) नेमके कारण ज्ञात नाही. याबाबत अजूनही संशोधन सुरु आहे.
GBS आजाराची लक्षणे
अंग दुखणे
चालताना तोल जाणे
चेहरा सूजने
चालताना व गिळताना त्रास होणे
हात-पाय लूळ पडणे
मुंग्या येणे, स्नायू कमकुवत होणे आणि डोळे किंवा चेहऱ्याची हलचाल करण्यास त्रास होणे यासारख्या लक्षणांबद्दल जागरूकता वाढविणे गरजेचे आहे. मज्जातंतू हळूहळू निकामी करून या आजाराचा विषाणू बोटं, पाय, हात, फुफ्फुसं आणि श्वसननलिकेवरही हल्ला चढवतो. अशावेळी रूग्णांची अवस्था पक्षाघात म्हणजे लकवा आल्यासारखी होते.
गुइलेन बॅरे सिंड्रोमसाठी नवीन उपचार पद्धती उपलब्ध आहेत. इम्युनोग्लोब्युलिन थेरपीपासून प्लाझ्मा थेरेपीपर्यंत उपचार करता येतात, जी रुग्णाच्या गरजांनुसार दिली जातात. नवीन वैद्यकीय प्रगतीमुळे रुग्णास सर्वात प्रभावी उपचार मिळू शकतात. या आजारात रक्तदाबाच्या समस्येपासून ते श्वास घेण्यास त्रास होण्यापर्यंतच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. गुइलेन बॅरे सिंड्रोम एक वेगाने प्रगतीशील पॉलीन्युरोपॅथी आहे, ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात. संशयास्पद रुग्णांसाठी इलेक्ट्रोमायोग्राफी आणि CSF विश्लेषण यासारख्या इलेक्ट्रोडायग्नोस्टिक टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो.