Ashadhi Wari Global Warkari 2023 : ग्लोबल वारी, ग्लोबल वारकरी, हरिनामात दंग जागतिक नेते, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सह जगभरातील नेत्यांची ग्लोबल वारी, पहा फोटो
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Ashadhi Wari Global Warkari 2023 : आषाढी एकादशीचा संपुर्ण महाराष्ट्रात आज मोठा उत्साह संचारला आहे.अवघा महाराष्ट्र विठूरायाच्या भक्तीत दंग झाला आहे.पंढरपूरात लाखो वारकरी विठूनामाचा गजर करत आहेत.अवघी पंढरी हरिनामाच्या घोषात न्हाऊन निघाली आहे. महाराष्ट्रातील वारी आता जागतिक पातळीवर पोहचली आहे. जगातील मातब्बर नेते आषाढी वारीत सहभागी झाले आहे. ही कमाल केली आहे अमित वानखेडे यांनी.
आमदार बच्चू कडू यांचे स्विय सहाय्यक अमित वानखेडे हे आर्टिफिशियल इंटेलिजेंस अर्थात AI च्या मदतीने राजकीय नेत्यांचे चित्र काढत आहेत, त्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेत आले आहेत. त्यांनी काढलेल्या या चित्रांना राज्यातून मोठी प्रसिध्दी मिळत आहे. आज आषाढी एकादशीनिमित्त अमित वानखेडे यांनी जगभरातील नेत्यांचे फोटो पोस्ट केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जगभरातील अनेक नेते वारीत सहभागी झाल्याचे या फोटोतून दाखवण्यात आले आहे.
अमित वानखडे हे नाव सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. वानखेडे यांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांचे आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या माध्यमांतून अर्कचित्र साकारले आहेत. यामध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांचे, महाराष्ट्रातील दिवंगत नेत्यांचे, त्यांनतर भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांचे लष्करी गणवेशातील चित्रे साकारली आहेत. आज आषाढी एकादशीनिमित्त त्यांनी जागतिक नेत्यांची चित्रे साकारली आहेत. अमित वानखडे यांनी ट्विटद्वारे जागतिक नेत्यांचे फोटो पोस्ट केले आहेत. त्यांत त्यांनी ग्लोबल वारी, ग्लोबल वारकरी, हरिनामात दंग जागतिक नेते अशी टॅगलाईन दिली आहे. चला तर मग खालील फोटोतून पाहूयात जागतिक नेत्यांची ग्लोबल वारी.