खुशखबर : आली रे आली; जामखेडला कोरोना लस आली (Good news: Corona vaccine has arrived in Jamkhed)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: मागील आठ ते दहा महिने ज्या कोरोनाने अख्ख जग परेशान झालं होतं तो कोरोना अजुनही समाजात ठाण मांडून बसलाय मात्र आता घाबरायचं कारण नाही कारण कोरोनाची लस बाजारात आली आहे. आता जामखेडमध्येही दाखल झाली आहे.(Good news: Corona vaccine has arrived in Jamkhed)

जामखेड तालुक्यातही कोरोनाने मोठे थैमान घातले होते. अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. आता जामखेडकरांसाठी एक खुशखबर समोर आली आहे. कोरोनावरील लस जामखेडच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल झाली आहे. आजपासुन शासकीय आरोग्य कर्मचार्यांच्या लसीकरणास प्रारंभ झाला आहे.(Good news: Corona vaccine has arrived in Jamkhed)

जामखेडचे तहसिलदार विशाल नाईकवाडे यांच्या हस्ते व तालुका आरोग्य अधिकारी डाॅ सुनिल बोराडे,  गटविकास अधिकारी परशुराम कोकणी तसेच वैद्यकीय अधिक्षक डाॅ संजय वाघ यांच्या उपस्थितीत कोरोना लसीकरणाला आज जामखेड ग्रामीण रूग्णालयात प्रारंभ करण्यात आला.(Good news: Corona vaccine has arrived in Jamkhed)

आरोग्य कर्मचारी ज्योती पवार यांनी पहिली लस घेतली आहे. पहिल्या टप्प्यात कोरोना काळात फ्रंटलाईनवर काम करणार्या 799 कोरोना योध्दाना ही लस दिली जाणार आहे. यावेळी डाॅ कुंडलिक अवसरे, डाॅ शिदे, डाॅ हंगे, डाॅ शाम जाधवर, संजय कोठारी, अधिपरिचारिका सातपुते, माळी सह आदी कर्मचारी उपस्थित होते.