Monsoon withdrawn News । शेतकऱ्यांसाठी खुशखबर, पाऊस थांबणार, मान्सून कधी माघार घेणार? जाणून घ्या याविषयीची महत्त्वाची अपडेट !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । 21 ऑक्टोबर 2022 । Monsoon withdrawn News | महाराष्ट्रात परतीच्या पावसाने हाहाकार उडवून दिला आहे. अतिमुसळधा पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परतीचा मान्सून कधी माघारी परतणार यांची ओढ बळीराजाला लागली होती अखेर याबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे.
हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, मान्सूनने आज विदर्भातून माघार घेतली आहे. पुढील 48 तासात संपूर्ण देशातून मान्सून निघून जाईल अशी माहिती हवामान शास्त्रज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिली आहे.
24 तारखेच्या दरम्यान समुद्र किनारी चक्रिवादळ निर्माण होण्याची शक्यताअसून 25 तारखेला चक्रीवादळ आंध्र आणि ओरिसा किनारपट्टीपासून पश्चिम बंगाल, बांग्लादेशकडे जाणार. तर महाराष्ट्रावर या चक्रीवादळाचा कुठलाही परिणाम होणार नाही अशी माहिती देखील हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान आज आणि उद्या कोकण भाग, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात गडगडाटासह पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन दिवस पुणे, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर या भागात ढगाळ वातावरण रहाणार असून मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.
सध्या अंदमान समुद्र आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात कमी दबाचे क्षेत्र आहे, तीन ते चार दिवसात ते तीव्र होणार आहे. त्याचा प्रवास किनारपट्टीच्या भागाकडे होण्याची शक्यता आहे. सोमवारच्या आसपास ते चक्रिवादळात रुपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यानंतर २५ तारखेला ते किनारपट्टीला लागून पश्चिम बंगाल, बांग्लादेशाकडे जाण्याची शक्यता हवामान विभागान वर्तवली आहे. दरम्यान राज्यात या वादळामुळे कुठलाही इशारा हवामान विभागाने दिला नाही, असे होसाळीकर यांनी सांगितले.