जामखेड टाइम्स वृत्तसेवा । अहमदनगर- परळी रेल्वे मार्गावरील अहमदनगर ते आष्टी हा रेल्वेमार्ग पुर्ण झाला आहे. या मार्गावर रेल्वे सेवाही सुरु झाली, पण या रेल्वेच्या वेळापत्रकामुळे आष्टीसह जामखेड तालुक्यातील प्रवाश्यांना याचा म्हणावा तसा फायदा होत नव्हता, परंतू आता आष्टी आणि जामखेड तालुक्यातील प्रवाश्यांचे अहमदनगरला दररोज रेल्वेने ये -जा करण्याचे स्वप्न पुर्ण होणार आहे.
अहमदनगर ते न्यू आष्टी या रेल्वे मार्गावर एकच डेमू रेल्वे धावत होती. या रेल्वेचे वेळापत्रक जामखेड आणि आष्टी तालुक्यातील प्रवाश्यांसाठी अडचणीचे होते. आष्टीहून रेल्वेने अहमदनगर गेल्यावर येताना मात्र रेल्वे नव्हती, यामुळे प्रवाश्यांना बसने आष्टीला परतावे लागायचे. यामुळे या रेल्वेत हौशी प्रवासीच प्रवास करायचे. रेल्वेकडे प्रवाश्यांनी पाठ फिरवली होती.
परंतू आता दररोज आष्टीहून अहमदनगरला रेल्वेने प्रवास करण्याचे स्वप्न साकार होणार आहे, कारण या मार्गावर आणखी एक रेल्वे धावणार आहे. अहमदनगर रेल्वे स्थानकावरून आष्टीसाठी नियमित दुसरी रेल्वे उद्या 17 नोव्हेंबर 2022 पासुन सुरु होणार आहे. या सेवेचा शुभारंभ रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी साडेतीन वाजता हा कार्यक्रम अहमदनगर येथे पार पडणार आहे.
अहमदनगर- न्यू आष्टी या रेल्वेची नियमित दुसरी फेरी 17 पासून सुरू होणार असल्याने जामखेड आणि आष्टी तालुक्यातील जनतेला याचा मोठा फायदा होणार आहे. रेल्वेकडून दुसरी फेरी सुरू करण्यात येत असल्याने जनतेतून या निर्णयाचे स्वागत होत आहे. नोकरदार तसेच विद्यार्थी, व्यवसायिक आणि शेतकरी बांधवांना या सेवेचा मोठा फायदा होणार आहे.
अहमदनगरहून न्यू आष्टी-अहमदनगर (गाडी क्रमांक 01404) ही रेल्वे किती वाजता सुटणार ?
- गाडी क्रमांक 01403 अहमदनगर-न्यू आष्टी ही रेल्वे अहमदनगरहून दुपारी 03.40 वाजता सुटेल
- नारायणडोहोला 04.40 वा आगमन व 04.42 वा प्रस्थान.
- लोणी आगमन 04.58 वा. प्रस्थान 05.00 वा.
- सोलापूरवाडी आगमन 05.25 प्रस्थान 05.27,
- न्यू धानोरा आगमन 05.43 प्रस्थान 05.45 वा.
- कडा आगमन 05.55 वा. प्रस्थान 05.57 वा.
- न्यू आष्टी सायंकाळी 06.30 वा पोहचेल.
आष्टीवरून न्यू आष्टी-अहमदनगर (गाडी क्रमांक 01404) ही रेल्वे किती वाजता सुटणार ?
- न्यू आष्टी-अहमदनगर ही रेल्वे न्यू आष्टीहून सायंकाळी 07.00 वा. सुटणार
- कडा आगमन 07.28 वा. प्रस्थान 07.30 वा.
- न्यू धानोरा आगमन 04.40 वा. प्रस्थान 07.42वा.
- सोलापूरवाडी आगमन 07.58 वा.प्रस्थान 08.00 वा.
- न्यू लोणी आगमन 08.25 वा.प्रस्थान 08.27 वा.
- नारायणडोहो आगमन 08.53 वा.प्रस्थान 08.55.वा.
- अहमदनगरला रात्री 09.45 वाजता पोहचेल.