खुशखबर ! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाला भेट देणार्या पर्यटकांसाठी जालना ते चोंडी बस सेवेला प्रारंभ, जालना – चोंडी बसचे वेळापत्रक काय? जाणून घ्या
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Ahilya Devi Holkar) यांचे जन्मस्थान असलेल्या श्री क्षेत्र चोंडी (Chondi) येथील स्मारकाला राज्यासह देशभरातील भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नुकत्याच पार पडलेल्या जयंती सोहळ्याला लाखोंच्या जनसागराने चोंडीत हजेरी लावली होती. मराठवाड्यातील पर्यटकांसह (Tourists in Marathwada) अहिल्या भक्तांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (Maharashtra State Transport Corporation) एक आनंदाची बातमी दिली आहे. (Good News)
श्री क्षेत्र चोंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास भेट देण्यासाठी मराठवाड्यातून येणाऱ्या पर्यटकांसह अहिल्या भक्तांच्या प्रवासाची गैरसोय दुर व्हावी यासाठी जालना आगाराने जालना – चोंडी बससेवा सुरू (Jalna – Chondi bus service started) करण्याचा निर्णय घेतला आहे. ही बस सुरु झाल्याने पर्यटकांना थेट अहिल्यादेवी होळकर स्मारकाला थेट भेट देता येणार आहे. ही बस सुरु झाल्यामुळे पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. गेल्या दोन दिवसांपासून ही बस सुरू झाली आहे. आज या बसचे जामखेड तालुक्यातील विविध गावांमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. चोंडीत ही बस आल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी चालक व वाहकाचा सन्मान केला.
पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचे जन्मस्थान असलेले श्री क्षेत्र चोंडी हे देशाच्या पर्यटन नकाशावर यावे, चोंडीत पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास भेट देणाऱ्या पर्यटकांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे कार्य समजावे हा त्यामागच्या उद्देश आहे. श्री क्षेत्र चोंडीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढावी, यासाठी एसटी महामंडळाने जालना आगाराची बस चोंडीसाठी सुरु केली आहे.श्री क्षेत्र चोंडीला येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यास स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल.
जालना – चोंडी बसचे वेळापत्रक काय? जाणून घ्या
जालना आगाराची जालना ते चोंडी ही बस अंबडहून सकाळी सहा वाजता चोंडीकडे निघेल, बीडला 10:30 वाजता ही बस पोहचेल, त्यानंतर जामखेडला 12 वाजता ही बस पोहचेल त्यानंतर ही बस श्री क्षेत्र चोंडी येथे 12 : 40 वाजता पोहचेल. दुपारी 1 वाजता पुन्हा ही बस चोंडीहून जालन्याकडे रवाना होईल.