Gurudas baba Mardi News : गरम तव्यावर बसून भाविकांना आशिर्वाद देणारा गुरुदास बाबा निघाला बलात्कारी, फरार भोंदूबाबाच्या शोधासाठी पोलिसांनी कसली कंबर !

अमरावती : Gurudas baba Mardi News : महाराष्ट्रात जादुटोणा विरोधी कायदा अस्तित्वात असतानाही राज्याच्या वेगवेगळ्या भागात भोंदू बुवांचा सुळसुळाट सुरु आहे. गरम तव्यावर बसून भाविकांना आशिर्वाद देणारा एक बाबा सोशल मीडियावर मध्यंतरी चर्चेत आला होता. आता या भोंदूबाबाच्या वासनांधपणा बुरखा फाटला आहे. गरम तव्यावर बसून आशिर्वाद देणारा गुरुदास बाबा (Gurudas baba) हा बलात्कारी निघाला आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल होताच हा बाबा फरार झाला आहे. ही घटना अमरावती (Amravati) जिल्ह्यातील तिवसा (Tivsa) तालुक्यातून समोर आली आहे.

Gurudas baba Mardi News, Gurudas baba, who blessed devotees while sitting on hot griddle, turned out to be rapist, police are searching for fugitive Bhondu baba

महिला भाविकेचे अश्लिल व्हिडिओ तयार करून महिलेचे लैंगिक शोषण करणाऱ्या तथाकथित बाबा विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुदास बाबा (Gurudas Baba) ऊर्फ सुनिल कावलकर (Sunil Kavalkar) असे या भोंदू बाबाचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी याच बाबाचा, गरम तव्यावर बसून भाविकांना आशिर्वाद देत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता, तेव्हापासून हा बाबा गुरुदास बाबा म्हणून प्रसिध्दीच्या झोतात आला होता. या वायरल व्हिडिओमुळे त्याच्या दरबारात भाविकांची संख्या वाढली होती. त्याचा दरबार अमरावती जिल्ह्यातील मार्डी (Gurudas Baba Mardi) तालुका तिवसा येथे भरत होता. मार्डी गावात या भोंदूबाबाचा आश्रम आहे. त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल होताच हा बाबा फरार झाला आहे. (Gurudas baba Mardi News)

अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील मार्डी (Mardi) येथे तथाकथित भोंदूबाबा गुरुदासबाबा ऊर्फ सुनील जानराव कावलकर (Sunil Janrao Kavalkar) याचा आश्रम आहे. आपल्या समस्या सोडूवून घेण्यासाठी मानसिक तणावात असलेली जनता या गुरुदासबाबांच्या आश्रमात येते. मध्यप्रदेशातील जबलपूर येथे राहणारी एक महिला आपल्या व्यसनी पतीच्या त्रासाला कंटाळून कौटुंबिक कलह थांबावा या अपेक्षेने गुरुदासबाबाच्या आश्रमात आली होती. (Gurudas baba Mardi News)

गुरुदासबाबा अंगारा देतो आणि पौर्णिमेला पूजापाठ करून आपली समस्या सोडवतो हेच तीला सांगण्यात आले होते. मार्च 2023 दरम्यान अमरावती येथील एका मैत्रिणीच्या मदतीने पीडित महिला मार्डी येथे गुरुदासबाबाच्या आश्रमात आली. तिचे दुःख सांगितल्यावर या भोंदूबाबाने तीला अंगारा आणि प्रसाद देऊन मी जबलपूरला आलो की मला भेटायला ये असे सांगितले.

मे महिन्यात दोन वेळा गुरुदासबाबा जबलपूरला गेला असता तीला एकट्याला बोलावून तिची भेट घेतली. तेव्हापासून तीचे मार्डी येथे येणे-जाणे सुरू झाले. गुरुदासबाबाने तीला सहा-सात महिने आश्रमातच रहावे लागेल असे सांगितले आणि ती तयारही झाली.गुरुदासबाबाने तीच्या भावनांचा फायदा घेऊन तुझा पती सुधारला तर ठीक नाहीतर मीच तुझ्याही लग्न करणार असे सांगून तिच्यावर जवळपास तीन महिन्यापर्यंत लैंगिक अत्याचार केला. (Gurudas baba Mardi News)

दरम्यान एक दिवस या दुराचारी बाबाचा मोबाईल फोन पीडितेच्या हाती लागला. त्या फोनमध्ये तिच्यावर केलेल्या लैंगिक अत्याचारची चित्रफीत तीने पाहिली. घडलेला प्रकार लक्षात आल्याने भीतीपोटी काहीही न बोलत तीने मी आश्रमात राहणार नाही असे सांगीतल्या नंतर गुरुदासबाबाने 2 जानेवारीला पिडीतीला नागपूरपर्यंत नेऊन सोडले. मे 2023 पासून 2 जानेवारी 2024 पर्यंत ती आश्रमात होती.या दरम्यान तिचे कुटुंबात काहीच चांगले झाले नाही. (Gurudas baba Mardi News)

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पिडीतेने गुरुदासबाबाला फोन केला आणि विचारणा केली असता गुरुदासबाबाने तिलाच धमकावले. यावरून पीडित महिलेने कुऱ्हा पोलिस स्टेशन गाठून आपल्यावर झालेल्या अत्याचाराची जबानी दिली, त्यानुसार कुऱ्हा पोलिस स्टेशनमध्ये भोंदू गुरुदासबाब उर्फ सुनील जानराव कावलकर (वय 47) याच्याविरोधात अत्याचार, धमकावणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गुरुदासबाब हा फरार असून त्याचा कसून शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Gurudas baba Mardi News)

Gurudas baba Mardi News : फरार भोंदूबाबाच्या शोधासाठी पोलिसांनी कसली कंबर

पीडितेने भोंदू बाबा विरोधात अमरावतीतील तिवसा तालुक्यातील कुऱ्हा पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराची तक्रार दाखल केली. पोलिसांनी भोंदूबाबा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस मागावर असल्याची कुणकुण लागताच आरोपी भोंदू बाबा आश्रमातून फरार झाला आहे. फरार भोंदू बाबाला शोधण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. (Gurudas baba Mardi News)