जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्रात जुन महिन्यात पाऊस फारसा सक्रीय नव्हता, परंतू जूलै महिन्यात पावसाने तुफान बॅटिंग केली. राज्यातील अनेक भागांना पुराचा फटका बसला. अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत तर काही भरण्याच्या मार्गावर आहेत. त्याच बरोबर देशातील अनेक राज्यात पूरस्थिती अजूनही आहे. त्यामुळे काही भागातील जनजीवन विस्कळीत आहे.
बिग ब्रेकिंग : कर्जत – जामखेडमधील 9 सराईत गुन्हेगार तडीपार, प्रांताधिकारी डाॅ अजित थोरबोले यांचे आदेश
एक जूनपासून ते आजअखेर महाराष्ट्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे 102 बळी गेले आहेत. राज्यातील पुर परिस्थितीत बचाव कार्य करण्यासाठी 14 NDRF, 5 SDRF टीम काम करत आहे. 11 हजार 900 नागरिकांना सुखरूपपणे वाचवण्यात बचावपथकाला यश आले. अतिवृष्टीमुळे राज्याच्या अनेक भागात मोठे नुकसान झाले आहे. घरांची पडझड, पुरामुळे शेतीचेही नुकसान झाले आहे.
नाकातून Fabispray घ्या आणि कोरोनाला पळवून लावा, फॅबीस्प्रेची किंमत किती ? हा स्प्रे कोण वापरु शकतं ? जाणून घ्या सविस्तर
राज्यातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, कोल्हापूर, मुंबई, पुणे, नाशिक, नांदेड, हिंगोली, लातूर, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात पावसाने तुफान बॅटिंग केली आहे. याशिवाय अन्य भागातही पावसाने सरासरी हजेरी लावली आहे. राज्यातील मोठी धरणे निम्मी भरली आहेत. पावसाने अत्तापर्यंत 100 हून अधिक बळी घेतले आहेत. राज्यातील अनेक नद्या धोका पातळीवरून वाहत आहेत.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : अहमदनगर जिल्ह्यातील 9 लाख 39 हजार 481 घरांवर तिरंगा फडकणार, हर घर तिरंगा अभियान !
माणसांबरोबरच जनावरांनाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. तब्बल 185 जनावरे मुसळधार पावसामुळे दगावली आहेत. राज्यात मागील दीड महिन्यात मुसळधार पावसामुळे किती नुकसान झाले याची जिल्हानिहाय सविस्तर आकडेवारी राज्य आपत्ती व्यवस्थापनाकडून अजूनही जारी करण्यात आलेली नाही.
8th World Youth Skills Day 2022 | कौशल्य हीच आजच्या तरुणाईची ताकद – निशांत सूर्यवंशी, अहमदनगरला 8वा जागतिक युवा कौशल्य दिन उत्साहात साजरा
राज्यात सत्तांतर झाले. नवे सरकार आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेच राज्याचा कारभार हाकत आहेत, राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी रखडला आहे. प्रशासकीय नियुक्त्या रखडल्या आहे. राज्यात पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. बळीराजा संकटात आहे. शासनाची मदत तातडीने पोहचणे आवश्यक आहे. विरोधी पक्ष सरकारवर टीकेचे बाण सोडताना दिसत आहे.