जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Heavy rains in Maharashtra for next 5 days | उत्तर भारतात पावसाचे धुमशान सुरू आहे. मान्सून (Monsoon) देशातून लवकर माघार घेणार नाही. आणखी किमान दहा दिवस मान्सूनचा देशात मुक्काम असेल असे हवामान विभागाकडून (Meteorological Department)सांगण्यात आले आहे.
पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस (Heavy rain) कोसळेल, असा अलर्ट हवामान (Weather alert) खात्याने जारी केला आहे. मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढचे दोन ते तीन दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने केले आहे. (Heavy rains in Maharashtra for next 5 days)
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, मंगळवारी गुजरातच्या अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, गोवा, विदर्भ, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, अंदमान-निकोबार, आसाम, मेघालय, सौराष्ट्र, कच्छ, तेलंगणा, तामीळनाडू, पुद्दुचेरी आदी भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी लागेल.(Heavy rains in Maharashtra for next 5 days)
पुढील चार ते पाच दिवस विविध राज्यांत पावसाचा जोर वाढणार आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, रायलसीमा, केरळ आदी भागांत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह धो-धो पाऊस कोसळेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची स्थिती तयार होत आहे .(Cyclone conditions are developing in the Bay of Bengal) याचा परिणाम म्हणून मुंबई , विदर्भासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत पावसाचा जोर वाढेल . महाराष्ट्रासाठी पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचे असतील , असे कुलाबा येथील प्रादेशिक हवामानशास्त्र विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ . शुभांगी भुते यांनी सांगितले. (Heavy rains in Maharashtra for next 5 days)
स्कायमेट वेदरच्या अंदाजानुसार
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे (Maharashtra Rain). स्कायमेट वेदरने (Sky mate Weather) 23 सप्टेंबरपर्यंत मुंबई (Rain In Mumbai) आणि मुंबईच्या उपनगरी भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.स्कायमेट तज्ञ महेश पुलावट यांनी अंदाज वर्तवला आहे की मान्सून केवळ मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात कायम राहील.(Heavy rains in Maharashtra for next 5 days)
यामुळे 23 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय, विदर्भातील काही भागात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील धरणातील पाण्याची पातळी वाढली असून नदीकाठावर राहणाऱ्या लोकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार 23 सप्टेंबरनंतर हवामान स्वच्छ होईल. पश्चिम किनारपट्टीवर सक्रिय मान्सूनमुळे 23 सप्टेंबरपर्यंत पाऊस पडेल. स्कायमेटच्या मते, पाऊस अधून मधून असेल, सतत पाऊस पडणार नाही. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. असे देखील सांगितले आहे.
महाराष्ट्रातील विदर्भ आणि मुंबई भागात आजपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे बंगालच्या उपसागरावर एक चक्रीवादळ परिसंचरण विकसित होत आहे. तो जसजसा तीव्र होईल तसतसा महाराष्ट्रात आणखी पाऊस वाढण्याची शक्यता आहे.
याची सुरवात सर्वप्रथम विदर्भात पासून होईल. जरी ते मुख्यतः राज्याच्या उत्तर भागाला पूर्व ते पश्चिम कव्हर करेल, परंतु काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते. यानंतर, पालघर, ठाणे आणि मुंबईच्या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये आणि त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस पडेल.(Heavy rains in Maharashtra for next 5 days)