जामखेड टाइम्स वृत्तसेवा : आज मुंबईत मान्सून दाखल झाला. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या काही भागांमध्ये मान्सून दाखल झाला असल्याची माहिती हवामान विभागाने जारी केली. (Heavy rains in Maharashtra in next 5 days, weather department warns)
IMD हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सून मुंबईमध्ये वेळेवर दाखल झाला आहे. येत्या दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात सर्वदूर पोहचेल. मान्सून सामान्य गतीने पुढे जात आहे.
आजपासून पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज आज हवामान विभागाने जारी केला आहे, या अंदाजानुसार पुढील पाच दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.या अंदाजानुसार कोकणामध्ये पावसाची तीव्रता जास्त असणार आहे.
दरम्यान आज मुंबईमध्ये मान्सूनचे धडाक्यात आगमन झाले. मुंबईतील अनेक भागात पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. मुंबई, डहाणू,ठाणे रायगड, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पुण्यापर्यंत आणि कर्नाटकातील गदगपर्यंत मान्सून दाखल झाले असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
हवामान विभागाने आगामी पाच दिवस महाराष्ट्राा मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. या अंदाजानुसार राज्यातील बहुतांशी भागाला येेलो अलर्ट देण्यात आहे. तसेच कोकण परिसराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.