chandrayaan 3 update : नमस्कार पृथ्वीवासियांनो, मी चंद्राच्या कक्षेत आहे, कृपया मला काही छायाचित्रे पोस्ट करण्याची परवानगी द्याल का?, चांद्रयान 3 ने पाठवला इस्त्रोला संदेश !
chandrayaan 3 update in marathi : संपुर्ण जगाचे लक्ष लागलेल्या भारतीय चांद्र मोहिमेला सोमवारी मोठे यश यश मिळाले आहे. भारताच्या चांद्रयान 3 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. प्रवेश करताच चांद्रयान 3 ने भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात एक संदेश पाठवला आहे.
याबाबत चांद्रयान 3 या मोहिमेसाठी बनवण्यात आलेल्या ट्विटर अकाउंटवरून हा संदेश प्रसारित करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, नमस्कार पृथ्वी वासीयांनो! मी चंद्राच्या कक्षेत आहे, इस्त्रो, कृपया मला काही चित्रे पोस्ट करण्याची परवानगी द्याल का? जेणेकरून मला त्याचा हेवा वाटू शकतो, असे संदेश पाठवण्यात आला आहे.
भारताची तिसरी चांद्र मोहिम 14 जूलै 2023 रोजी सुरु झाली. चांद्रयान 3 ने आता चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. येत्या 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान 3 चंद्रावर सॉफ्ट लॅंडींग करणार आहे. त्यादृष्टीने चांद्रयान 3 ने सुरु असलेली वाटचाल समस्त भारतीयांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.