high court cancels cet exam for 11th admission | सीईटी परीक्षेसंदर्भात उच्च न्यायालयाने घेतला मोठा निर्णय
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : High Court cancels CET exam for 11th admission |कोरोनाने मागील दोन वर्षांत मांडलेल्या हैदोसामुळे शालेय विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. या काळात शाळा बंद झाल्या,ऑनलाईन शिक्षण आले पण ऐनवेळी परिक्षा रद्द झाल्या. मग मुल्यांकनावर दहावीचे निकाल आले. अकरावीला प्रवेश कुठल्या आधारावर देणार याचीच चर्चा रंगलेली असताना अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्याची घोषणा झाली. मग या निर्णयाला हायकोर्टात अव्हान दिले गेले.
त्यावर आज १० रोजी निकाल देताना हायकोर्टाने राज्य सरकारला मोठा दणका दिला आहे. अकरावीच्या प्रवेशांसाठी सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय हायकोर्टाने रद्द केला आहे. तसेच दहावीच्या मूल्यांकनाच्या आधारे अकरावीला प्रवेश देण्याचे आदेश दिले आहे. (High Court cancels CET exam for 11th admission)
सीईटीबाबतच्या या अधिसूचनेला आयसीएसईची विद्यार्थिनी अनन्या पत्की हिने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवरील सुनावणी न्या. आर. डी. धानुका व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे झाली.(High Court cancels CET exam for 11th admission)
अपवादात्मक परिस्थितीत सीईटी घेण्यात येत आहे, तसेच गुणांच्या आधारे प्रवेश देण्याकरिता परीक्षा घेण्यात येणार आहे, असा युक्तिवाद राज्य सरकारतर्फे महाअधिवक्ते आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयात केला होता. दरम्यान, सीईटी मे मध्ये जाहीर करण्यात आली तरी ही सीईटी एसएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल, हे जुलैमध्ये जाहीर करण्यात आले, असे अनन्याचे वकील व वडील योगेश पत्की यांनी म्हटले होते.(High Court cancels CET exam for 11th admission)
अकरावीच्या प्रवेशाकरिता घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेच्या निर्णयाविरुद्ध हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. २८ मे रोजी सरकारने कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी पूर्णपणे एसएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल, अशी अधिसूचना काढली होती. ही अधिसूचना आज निकाल देताना हायकोर्टाने रद्द केली आहे. तसेच सहा आठवड्यांत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. (High Court cancels CET exam for 11th admission)