Hottest Place In World | जगातल्या 10 उष्ण ठिकाणांमध्ये महाराष्ट्रातील दोन शहरांचा समावेश : चंद्रपूर ठरले जगातील तिसरे उष्ण शहर
जामखेड टाईम्स वृत्तसेवा । Hottest Place In World, जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये भारतातील चार ठिकाणांचा समावेश झाला आहे. यात महाराष्ट्रातील दोन शहरांचा समावेश आहे. विशेष म्हणजे जगातील पहिल्या तीन उष्ण शहरांमध्ये चंद्रपुरचा समावेश झाला. मंगळवारी येथील तापमानाचा पारा 43.4 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता (Chandrapur third hottest place in world, Two cities in Maharashtra are among the 10 hottest places in the world)
मंगळवारी नोंदलेल्या तापमानानुसार, चंद्रपूर हे शहर तिसऱ्या क्रमांकाचं जगातील सर्वाधिक उष्ण शहर ठरलं आहे. काल सकाळपासूनच चंद्रपुरात उन्हाचा चटका वाढला होता. रात्री देखील नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला आहे. मंगळवारी मालीतील कायेस शहर हे पृथ्वीतलावरील सर्वाधिक उष्ण शहर ठरलं आहे. या ठिकाणी तापमानाचा पारा 44.4 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. (Hottest Place In World)
त्यापाठोपाठ सर्वाधिक उष्ण शहराच्या यादीत मालीतील सेगोऊ शहराचा दुसरा क्रमांक लागला आहे. येथील तापमान 43.8 अंश नोंदवलं गेलं आहे. त्यानंतर भारतातील चंद्रपूर हे पृथ्वीतलावरील तिसरं सर्वात उष्ण शहर ठरलं आहे. मंगळवारी येथील तापमानाचा पारा 43.4 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. (Hottest Place In World)
सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत पहिल्या दहा शहरांमध्ये भारतातील चार शहरांचा समावेश आहे. विदर्भातील अकोला हे शहर सातव्या क्रमांकावर असून मंगळवारी येथील तापमान 43.1 अंश सेल्सिअस एवढं नोंदलं आहे. तर भारतातील पिलानी आणि चुरू ही शहरं अनुक्रमे 43.1 अंश सेल्सिअस आणि 43 अंश सेल्सिअससह आठव्या आणि नवव्या स्थानावर आहेत. (Hottest Place In World)
भारतात सध्या उष्णतेची लाट सुरू झाली आहे. नागरिकांनी उष्माघातापासून बचावासाठी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. शक्यतो दुपारी 1 ते 4 या काळात विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.