मी सागर बंगल्यावर येतो, मला मारून दाखवा, मनोज जरांगे पाटील झाले प्रचंड आक्रमक, आंतरवली सराटीत प्रचंड गोंधळ !

Manoj Jarange Patil live updates : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी निर्णायक लढा पुकारलेले मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीत (Antarvali Sarati) आज निर्णायक बैठक घेतली आहे. या बैठकीत मनोज जरांगे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे नाव घेऊन पहिल्यांदाच गंभीर आरोप केले आहेत. यावेळी मनोज जरांगे पाटील प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसून आले.मराठा बांधवांना न जुमानता ते तडक बैठकीतून मुंबईच्या दिशेने चालत निघाले. जरांगे पाटील यांनी घेतलेल्या पवित्र्यामुळे अंतरवली सराटीत प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. (Manoj Jarange on Devendra Fadanvis)

I come to Sagar Bungalow, kill me, Manoj Jarange Patil became very aggressive, Manoj Jarange Patil live updates, Manoj Jarange on Devendra Fadanvis

मराठा समाजाला आरक्षण मिळू नयेत यासाठी सर्व एकटा देवेंद्र फडणवीस प्रयत्न करतोय, असे जरांगे म्हणाले आहेत. दरम्यान बोलत असताना जरांगे पाटील अचानक आक्रमक झाले, जमलेला मराठा समाज त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र ते शांत होत नव्हते. बैठक स्थळी अचानक एकच गोंधळ उडाला.मराठा समाजाच्यावतीने अनेकजण जरांगे यांना शांत बसण्याचे आवाहन करत होते.

मनोज जरांगे उपोषण करत होते त्याठिकाणी बोलत असताना ते अचानक आक्रमक झाले, मी सागर बंगल्यावर येतो. मी आता येतो सागर बंगल्यावर तुम्हाला माझा बळी घ्या पण खोटे आरोप करू नका, असं म्हणत मनोज जरांगे उठून जाऊ लागले त्यावेळी जमलेल्या मराठा समाजाने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.

“मी आज तुम्हाला सगळं काही सांगणार आहे. देवेंद्र फडणवीस यांना एवढीच खुमखुमी आहे ना तर ही बैठक संपल्यावर मी सागर बंगल्यावर येतो. मला त्यांनी मारून दाखवावं. तुम्हाला माझा बळी घ्यायचा आहे का? मी सागर बंगल्यावर येतो. माझा त्यांनी बळी घेऊन दाखवावा. मी समाजाशी असलेली इमानदारी सोडू शकणार नाही. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे. आम्ही घेणारच. मी १० टक्के आरक्षणाला हात लावणार नाही,” असेदेखील जरांगे म्हणाले.

मी सागर बंगल्यावर येतो, घ्या माझा बळी असं म्हणत जरांगे पाटील म्हणाले. यानंतर ते स्टेजवरून उठून निघाले होते. उपोषणामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली आहे. यामुळे स्टेजवर गोंधळ निर्माण झाला. जरांगे मी मुंबईला चालत जाणार असं म्हणत जागेवरून उठले. तेव्हा उपस्थित मराठा समाजाने त्यांना शांत होण्याचा सल्ला दिला. जरांगेंना श्वास घेताना त्रास होत होता. मात्र तरीही ते आक्रमकपणे बोलत असताना दिसले. तब्येत बिघडेल तुम्ही शांत व्हा अशी विनंती उपस्थित असलेले मराठा बांधव करत होते.

मला मारण्याचा प्रयत्न होत आहे. मी सागर बंगल्यावर येतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला मारुन दाखवावं, असे थेट आव्हान मनोज जरांगे यांनी केले आहे. सगळ्यामागे फडणवीस असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

छत्रपतींशी शपथ घेऊन सांगतो मी कोणत्याही पक्षाचा नाही, कोणत्याही पक्षाकडून मला मदत मिळत नाही. मी कोणत्या पक्षाचा नाही मी फक्त माझ्या समाजाचा आहे. मराठ्यांना संपवण्याचा कुणाची तरी डाव आहे. यात देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे हे मी इथे स्पष्ट सांगतो. मराठ्यांना-मराठ्यांच्या हातूनच हरवण्याचा त्यांचा डाव आहे, असा गंभीर आहे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

“मला बदनाम करण्यासाठी गेवराई तालुक्यातील २ आणि अंबड तालुक्यातील एकजण नारायण राणेंनी उचलून नेला आहे. त्यांच्या माध्यमातूनही आता पत्रकार परिषदा चालू होणार आहेत. देवेंद्र फडणवीस जर असं करू नको म्हणाले तर नारायण राणेंची असं काही करण्याची हिंमत नाही. त्यामुळे हे सर्वकाही देवेंद्र फडणवीस यांचं षडयंत्र आहे. फडणवीस म्हणाले तर एका मनिटात सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी होईल,” असाही आरोप जरांगे यांनी केला.

दरम्यान, आंतरवली सराटीच्या बैठकीत आक्रमक झालेल्या मनोज जरांगे पाटील यांना भोवळ आल्याचे वृत्त आहे.