IAS Transfer Maharashtra : 20 मार्च 2024 । आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे निवडणूक आयोगाच्या दणक्यामुळे सरकारने राज्यातील वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS Transfer 2024) तडकाफडकी बदल्या केल्या आहेत.निवडणूक आयोगाने नुकतंच देशभरातील विविध राज्यांना तीन वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ असणाऱ्या अधिकाऱ्यांचा किंवा गृह कॅडर असलेल्या अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. (Maharashtra IAS Latest News)
सरकारने राज्यातील 12 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर (Abhijit Bangar), मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे (Ashwini Bhide), जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अंकित (Ankit), बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी विशाल नरवाडे (Vishal Narwade) , धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकीरी शुभम गुप्ता (Shubham Gupta), आएएस अधिकारी संजय मीना Sanjay meena), अमित सैनी (Amit saini) यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्यानंतंर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Maharashtra IAS Latest News Today)
निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांना हटवण्याचे आदेश नुकतेच दिले होते. त्यानंतर आज महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची तडकाफडकी बदली केली आहे. त्यांना मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तिथे सध्या पी. वेलरासू (P Velarasu) कार्यरत आहेत.
तसेच मुंबई महापालिकेच्या दुसऱ्या विद्यमान अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांची मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये बदली करण्यात आली आहे. त्यांच्यावर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.
कुणाची नियुक्ती कुठे?
जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकीरी अंकित यांची बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. तसेच आएएस अधिकारी संजय मीना यांची नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे महानगर आयुक्त म्हणून नियुक्त केली आहे. सध्या इथे मनोजकुमार सूर्यवंशी (Manoj Kumar Suryavanshi) कार्यरत आहेत. तर बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांची धुळे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली केली आहे. सध्या इथे शुभम गुप्ता हे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
‘या’ अधिकाऱ्यांची बदली
अमित सैनि, अभियान संचालक, जलजीवन मिशन यांची नियुक्ती अतिरिक्त आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका या पदावर. (Amit Saini)
संजय मीना यांची नियुक्ती महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या पदावर.(Sanjay meena)
राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांची नियुक्ती आयुक्त, सहकार व निबंधक, सहकारी संस्था पुणे या पदावर. (Rajesh Narvekar)
विशाल नरवाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे या पदावर. (Vishal Narwade)
अभिजीत बांगर, आयुक्त, ठाणे मनपा यांची नियुक्ती अतिरिक्त महापालिका आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका या पदावर. (Abhijit Bangar)
अंकित, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा या पदावर. (Ankit)
कार्तिकेयन एस. मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी पुणे यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या पदावर. (Karthikeyan S)
अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक , मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन या पदावर. (Ashwini Bhide)
संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे या पदावर. (Santosh Patil)
शुभम गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव या पदावर. (Shubham Gupta)
पृथ्वीराज बी.पी, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, नागपूर यांची नियुक्ती अतिरिक्त आयुक्त, पुणे मनपा या पदावर. (Prithviraj B P)
डॉ. कुमार खेमनार अतिरिक्त आयुक्त, पुणे मनपा यांची नियुक्ती आयुक्त, साखर, पुणे या पदावर. (Dr Kumar Khemnar)